पुरंदरमध्ये शेतकरी खुष ः पूर्व पट्ट्यातील शेतकरी धास्तावले ः आजी माजीचे प्रकल्प सुसाट

Share now

Advertisement

सासवड

Advertisement

        बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळ आता पारगाव मेमाणे,  उदाचीवाडी, मुंजवडी,  एखतपूर, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी या जागेवर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या जागेवर माजी आमदार विजय शिवतरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे विमानतळ होण्यासंदर्भात मागणी केली होती.

Advertisement

यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील विद्यमान आमदार संजय जगताप यांनी विमानतळा साठी नवीन जागा पिसे, रिसे, पांडेश्वर, राजुरी,  नायगाव, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, आंबी खुर्द, सुचवली होती. या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभे राहणार आहे.

Advertisement

यामुळे दोन्ही आजी-माजी आमदारांच्या विनंत्यांना शासन दरबारी मोठी किंमत असल्याची चर्चा सध्या पुरंदरमध्ये रंगत आहे. तर पुरंदरच्या पूर्वपट्टीतील शेतकरी मात्र दास्तावलेला दिसत आहे.

Advertisement

         पुरंदर विमानतळ पूर्वीच्याच जागी होणार असल्याचे जाहीर केले. दि  ७ रोजी (भिवडी ता पुरंदर) येथे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा पुनरुच्चार करून पुरंदर तालुक्यात मूळच्याच जागी विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

त्यात मूळ ठिकाणच्या भूसंपादनाबाबत विभागीय आयुक्तांना आदेश देऊ, असेही त्यांनी जाहीर करून टाकले. तर पुरंदर विमानतळ पारगाव मेमाणे आणि त्या जवळच्या गावांमध्ये होणार आहे. विमानतळा शेजारीच ‘मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क’ही उभारले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Advertisement

त्यांच्या आदेशानुसार विमानतळासोबत लॉजिस्टिक पार्कही पुरंदर तालुक्यात उभारले जाणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही प्रकल्पांसाठी नेमकी किती जागा लागणार आहे, ती कशी संपादित करायची, याबाबत आम्ही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय़ घेणार आहोत. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन केले जाईल असेही यावेळी फडणवीस यांनी म्हटले होते.

Advertisement

        पुरंदर विमानतळाच्या जुन्या जागेवर दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नव्हत्या त्या माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.

Advertisement

तर विद्यमान आमदार संजय जगताप यांनी नवीन जागा विमानतळासाठी सुचवली होती. यासंदर्भात दिल्ली दरबारी जुनी जागा रद्द करण्यासंदर्भात व नवीन जागे संदर्भात बैठका घेतल्याचे देखील स्पष्ट झाले होते. नंतर विमानतळ प्राधिकरणाने नवीन जागेला नकार दिल्यानंतर आता

Advertisement

या नवीन जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पुरंदर मधील दोन्ही आमदारांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याची चर्चा सध्या पुरंदर मध्ये रंगत आहेत.

Advertisement

           पुरंदर तालुक्यातील मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानतळाच्या शेजारीच ‘मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विमानतळासह लॉजिस्टिक पार्कसाठी सुमारे सहा हजार हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

Advertisement

या दोन्ही प्रकल्पांसाठी भूसंपादनाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) सोपविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

       बारामती तालुक्यातील आंबी खुर्द, चांदगुडे वाडी, भोंडवेवाडी; तसेच पुरंदरमधील रिसे, पिसे, पांडेश्वर, नायगाव, राजुरी या आठ गावांत ‘लॉजिस्टिक पार्क’ व विमानतळ दोन्ही पुरंदर तालुक्यात होणार असल्याने मूळ जागेवर विमानतळ

Advertisement

आणि जवळच्याच रिसे, पिसे, पांडेश्वर, राजुरी, नायगाव या पाच गावांतील जमिनीवर ‘लॉजिस्टिक पार्क’ उभारले जाऊ शकते, असा अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

        माजी आमदार विजय शिवतारे यांनी सुचवलेल्या विमानतळाच्या भूसंपादन होणारे क्षेत्र गावांचे नाव क्षेत्र (हेक्टर)

Advertisement

पारगाव मेमाणे १०३७, उदाची वाडी २६१, मुंजवडी १४३, एखतपूर २७१, खानवडी ४८४, कुंभारवळण ३५१, वनपुरी ३३९ एकूण २,८३२

Advertisement

       आमदार संजय जगताप यांनी सुचवलेल्या विमानतळाच्या जागेवर आता लॉजिस्टिक पार्क’ होणार आहे यासाठी भूसंपादन होणारे क्षेत्र (हेक्टर) पिसे (पुरंदर) १२.५०००, रिसे (पुरंदर) ५२९.२३००, पांडेश्वर (पुरंदर) ९५३.२६००, राजुरी (पुरंदर) ५९५.७५००, नायगाव (पुरंदर) ३१०.०६००, भोंडवेवाडी (बारामती) १८.८७०० चांदगुडेवाडी ५०.९५००, आंबी खुर्द ६३२.७६०० एकूण ३१०३.३८०० भूसंपादन होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.