पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधी पारगावकरांना पत्रकारांची एलर्जी

Share now

  

Advertisement

Advertisement

पुरंदर ःः पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ  हा गेली अनेक वर्षांपासून नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. नुकतेच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे सरकार राज्यात स्थापन झाले आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर तालुक्यातील  पार पडलेल्या सभेनंतर पुरंदरचा विमानतळ मुद्दा पुन्हा  चर्चेत आला आणि जसं विमानतळ चर्चेत आलं तसा विमानतळाचा विरोध  करणाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली परंतु विमानतळ बाधित सात गावांमधील सर्वात मोठा गाव असलेल्या पारगावकरांनी  मात्र विमानतळ विरोधासोबतच पत्रकार बद्दलच्या आक्षेपार्ह  भावना देखील आता समोर येत आहे. 

Advertisement


 विमानतळ विरोधी  आंदोलन सुरू झाल्यापासून प्रसारमाध्यमांनी स्थानिक  शेतकरी व विमानतळ बाधितांसोबत उभ राहत त्यांच्या लढ्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिल मात्र आता या पारगावकरांना पत्रकारांची ऍलर्जी झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. दोन दिवसापूर्वी पारगावकरांची ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत विमानतळ विरोधी ठराव पारित करण्यासाठी व त्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी  पत्रकारांनाही बोलावण्यात आले

Advertisement

  परंतु यावेळी जाणीवपूर्वक  पत्रकारांवरती आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करण्यातच पारगावकरांचं पत्रकारांबद्दलचा आदरभाव दिसून आला, प्रसारमाध्यमांनी केवळ यांच्या विमानतळ विरोधी बातम्या करायच्या आणि बिनबुडाचे आरोप पत्रकारांवर करायचे  अशीच निव्वळ  अपेक्षा या ग्रामस्थांची  आहे  असेच दिसून येत आहे .

Advertisement

विशेष म्हणजे  पत्रकारांवरती आरोप करताना पारगावकर हे देखील विसरले की गेली सहा ते सात वर्षांपासून विमानतळ विरोधी होणारा हा संघर्ष पत्रकार आणि प्रसार माध्यमांनीच उचलून धरला आहे. 
 परंतु गरज सरो आणि वैद्य मरो अशीच पद्धत अवलंबित   कसल्याही गोष्टीचा भान व साधी  कृतज्ञता ही न दाखवता कृतघ्नपणे पारगावकरांनी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक  देऊन पत्रकारांचा कोणताही मुलाहिजान ठेवल्याने आता

Advertisement

पत्रकारांचाही पारगावकरांबद्दलचं मत बदलले तर वावगे ठरणार नाही   पत्रकारांवरती बेफानपणे, बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विमानतळ विरोधी पारगावकरांना आता प्रसार माध्यमे खरच साथ देतील का? हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. 

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.