सर्व परवानग्या घेऊनच पुतळ्याच्या अनावरणास येणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ःः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचा पडला विसर

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) शासनाच्या उदासीनतेमुळे शासकीय राजे नरवीर उमाजी नाईक यांचा स्मारकामध्ये पुतळा बसवण्यासाठी विलंब झाला असल्याने समाजातील दानशूर लोकवर्गणी गोळा करून स्मारकांमध्ये पुतळा आज बसवण्यात आला परंतु या पुतळ्याचे सर्व प्रकारच्या परवानग्या पूर्ण झाल्यानंतर मी या पुतळ्याच्या अनावरणास येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजातील नागरिकांना सांगितले.

Advertisement

           भिवडी (ता. पुरंदर) येथील आद्य क्रांतिवीर  राजे उमाजी नाईक  यांच्या स्मारकामध्ये 231 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत भिवडी व अखिल भारतीय बेडर बेरड कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते.

Advertisement

यावेळी राष्ट्रगीताने शासकीय मानवंदना देण्यात आली. भाजप नेते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर माजी आमदार योगेश टिळेकर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, आमदार जयकुमार गोरे,  आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार हर्षवर्धन पाटील. भाजपाच्या नेत्या संगीता राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. 

Advertisement

          शासनाच्या उदासीनतेमुळे अनेक वर्ष या स्मारकामध्ये पुतळा बसू शकला नाही. अशी खंत समाजातील अनेक नेत्यांनी व्यासपीठावरून बोलून दाखवली. त्यामुळे समाजातील नागरिकांना लोकवर्गणी गोळा करून हा पुतळा बसवावा लागला असल्याचे सुनील जाधव यांनी सांगितले.

Advertisement

        यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक हेमंत हरहरे, कृती समितीचे मार्गदर्शक आप्पासाहेब चव्हाण, कृती समिती अध्यक्ष मोहनराव मदने, गुलाब भांडवलकर, उमाजी नाईक यांचे सातवे वंशज रमणआण्णा खोमणे, सुनिल जाधव, भाजपाचे पुरंदर तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमन,

Advertisement

श्रीकांत ताम्हाणे, पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती निलेश जगताप, साकेत जगताप, मराठा महासंघाचे प्रशांत वांढेकर, तात्यासाहेब भिंताडे, सुनील जाधव, बदाम माकर, भिवडीच्या सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच संजय दिघे, किरण चव्हाण,

Advertisement

विकास भांडवलकर, कुंभारवळचे माजी उपसरपंच दीपक जावळे, कैलास भाडवलकर, राजू चौधरी, माऊली खोमणे, बापू जाधव, साधू दिघे,  विठ्ठल मोकाशी,  आदी उपस्थित होते.

Advertisement

        ………..उपमुख्यमंत्र्यांना राष्ट्रगीताचा विसर……….

Advertisement

दरम्यान मानवंदनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व यानंतर राष्ट्रगीताचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. परंतु उपमुख्यमंत्री हे राष्ट्रगीताच्या कार्यक्रमासाठी न थांबता थेट गाडीमध्ये बसले या ठिकाणी असणारे समाजबांधव राष्ट्रगीताचा कार्यक्रम आहे असे म्हणत होते. परंतु याकडे उपमुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली व उपमुख्यमंत्री गेल्यानंतर एक तास उन्हात थांबलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणून मानवंदना दिली. यामुळे समाज बांधवात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.