माझ्या पुरंदरची बलस्थाने! शब्दांकन कवी राजेंद्र सोनवणे

Share now

Advertisement

माझ्या पुरंदरची बलस्थाने!
शब्दांकन कवी राजेंद्र सोनवणे

Advertisement


या पुरंदर तालुक्यात माझा जन्म झाला या सारखे माझे दुसरे सौभाग्य नसावे अशीच भावना आम्हां सर्व पुरंदर वासीयांची असावी यात कुणाचेही दुमत नसावे निसर्गाने आणि इतिहासाने आमच्या पदरात जे दान टाकले त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही! छत्रपती संभाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, उमाजी नाईक, गोदाजी जगताप, आचार्यअत्रे, बाळाजी विश्वनाथ, ते निळू फुले, रजनीकांत, मराठा दिवाण बाळासो कुंजीर आपल्या तालुक्यातील, घन श्याम सुंदरा भूपाळी लिहणारे होणाजी बाळा सासवडचे, आनंदात मामा जगताप, नानासाहेब जगताप, गणपतराव निरगुडे, बापुराव हालवाई, मारुतराव नवले या मंडळीनी सासवड मध्ये सत्यशोधक चळवळीचे मोठे काम केले आहे, Justice V.M. तारकुंडे हे सासवडचे, अर्थ खात्याचे उपसचिव N.N. जगताप हे सासवडकर,. कै. नाथ हरी पुरंदरे हे सासवड कर, कै. माधवराव जगताप- Z.P. मुख्य कार्यकारी अधिकारी हे सासवडकर, श्रीमती शांताबाई कोटेचा या सासवड कर, कै. राव बहादूर नारायणराव सोपानराव बोरावके हे सासवड चे, हरीभाऊ बळवंत गिरमे हे सासवड चे, कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे सासवड चे., न्यायमूर्ती B.G.GOLE, S.B.JAGTAP,  R.S.DESHMUKH ही मंडळी सासवडकर होय, मुंबई चे मुख्य न्याय दंडाधिकारी हे पद भूषविणारे रविंद्र गाटे साहेब हे सासवडकर, राणी इंदुमती राजे या सासवड च्या होय, कै. दाजी सेठ निरगुडे हे सासवडकर, कै. प्राचार्य वसंतराव जगताप, ज्यांनी सेवा निवृत्ती नंतर आपली सर्व पुंजी संस्थेला दान दिली, हे सासवडकर होय. 
अशी अजून भरपूर माझ्या पुरंदरची जुनी बलस्थाने नवीन पिढीला सांगता येतील.

Advertisement

अलीकडचा क्रिकेट पटू ऋतुराज गायकवाड, चित्रकार सागर तळेकर हे ही आम्हीं पुरंदरकर असा अभिमान आणि अस्मिता उराशी बाळगून जगले आहेत आणि जगत राहतील, रोशन सातारकर आमच्या पुरंदरच्याच, दिल्ली डायरी सदर लिहिणारे काही दिवस गोमंतक चे संपादक असणारे तानाजी कोलते पुरंदर चेच, अंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज याच्या भारतात मुसक्या आवळणारे पोलीस अधिकारी श्री मधुकर झेंडे देखील पुरंदरचेच आपल्या कर्तबगारी रीने सनदी अधिकारी झालेले संभाजीआबा झेंडे, राजेंद्र बाप्पू जगताप पुणे मेट्रोचे प्रमुख आहेत! त्यांच्याच ब्याचचे वनपुरी गावचे गोरक्ष जगताप अतिशय गरीबीत शिकून आज कलेक्टर झाले आहेत! उभ्या भारतात असे एक गाव नसावे ज्याने दोन कुलुगुरु जन्माला घातले असतील माझ्या पुरंदर मध्ये हरगुडे नावाचे एक गाव आहे. ज्या गावाने दोन कुलगुरू या महाराष्ट्राला दिले आहेत. ते म्हणजे आदरणीय प्रभाकर ताकवले आणि राम ताकवले चित्रपट क्षेत्रात काम करणारा संंदिप इनामके देखील सासवडचे, श्वास या मराठी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे छाया चित्रण करणारे संजय मेमाणे देखील आपल्या पारगावाचे, डी,वाय,एसपी अमोल झेंडे, माझे वर्ग मित्र दादा गायकवाड देखील पुरंदरचेच, उत्तम आबा झेंडेचे चिरंजीव देखील वैमानिक झाले आहेत असे मी ऐकले आहे त्यांचे नाव लक्षात आता येईना आमच्या सोनोरी गावाचा निलेश काळे न्यायाधीश झाले आहे! आमच्या पुरंदर तालुक्यात पिपरे नावाचे एक गाव आहे त्या गावात प्रत्येक घरातील एक जण तरी भारतीय सैन्यात आहे! सकाळचे माजी संपादक मल्हार अरणकल्ले देखील आमच्या परींचे गावचे! 

Advertisement


आमच्या पुरंदरने एक ट्रक ड्रायव्हर ते आमदार असा प्रवास असणारे अशोक भाऊ टेकवडे सारखे लोकप्रतिनिधी देखील निवडून दिले आहेत! बळीराजा संघाचे व सध्याचे काळदरी गावचे सरपंच गणेश काका जगताप सुकाणू समितीचे सदस्य होते! चल हवा येऊ द्या चे निलेश साबळे हे देखील सासवडला राहत होते त्यांचे बालपण या मातीत गेले आहे!महाराष्ट्रच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे 22 व्या वर्षी नगराध्यक्ष अशी नोंद माझे वर्ग मित्र संजय अण्णा जगताप यांच्या नावावर आज ही कायम आहे! माझ्या पुरंदरचे कर्हेचे पाणी खरेच वेगळे आहे! विश्वासराव पेशवे यांची धर्मपत्नी पानिपतच्या युद्धातून आपल्या खांद्यावर घेऊन चालत पुण्यात येणारे जानु भिंताडा हे देखील भिवडी गावचेच 
आमच्या सोनोरी गावचे आमचे वंशज हारनाक कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईत प्रचंड शौर्य गाजवून विरगतीस प्राप्त झाले!

Advertisement

  “नवनाथ रसवंती गृह ” या ब्रँडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवणारे आमचे फडतरे आणि जगदाळे  बांधव हे देखील बोपगावचे! यांनी आम्हांला दाखवून दिले आहे की कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो त्यातून देखील प्रचंड प्रगती करता येऊ शकते, सध्याचे एक प्रभावी वक्ते आणि यशस्वी लेखक प्रा.नामदेवराव जाधव देखील आमच्या पुरंदरचेच आहेत! आमदार भाई जगताप, खासदार संजय काकडे यांची देखील नाळ पुरंदरशी जोडली आहे! लालाची भेळ, चंदूची मिसळ, मोजे सामोसे, समाधान वडापाव, ही देखील पुरंदरची ओळखच आहेत! पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नाव देण्यासाठी ज्यांचा फार मोठा वाटा होता ते प्रा.गौतम बेंगळे देखील पानवडी गावचे पुरंदर सारखा अंजीर आणि सीताफळ कुठे ही होत नाही याची अनोखी गोडी, आणि मधुरता कोठेही नाही जगाचे मार्केट काबीज करण्याची ताकत आमच्या या फळात आहे! 

Advertisement

 
गेल्या अटीतटीच्या आणि अतीशय संघर्षपूर्ण निवडणूकीत मा.आमदार संजय जगताप यांनी रोमहर्षक विजय मिळवला आज ते पुरंदरचे प्रथम नागरिक आहेत होय ते आमचे आज लोकप्रतिनिधी आहेत लोक नेते आहेत. लोकांनी अतिशय विश्वासाने त्यांच्या हाती पुरंदर सोपवला आहे.आमदार संजय जगताप यांची चिकाटी, जिद्द, कामाचा आवाका, लोकांच्यात मिसळण्याचे कसब, आणि त्यांचा संघर्षमय जीवनप्रवास मी गेली 30 वर्षे निरपेक्ष वृत्तीने अतिशय जवळून पाहतो आहे! या वरील नावाच्या कर्तुत्ववान यादीत अजून एक तेजस्वी नाव राहिले होते ते म्हणजे मा.चंदूकाका जगताप सासवडचा आधुनिक इतिहास जेंव्हा लिहिला जाईल तेंव्हा या व्यक्तीच्या जीवन प्रवासाला टाळून कुणाला पुढे जाताच येणार नाही! काकांचे शिक्षण जरी कमी असले तरी त्या वेळीच त्यांना शिक्षणाचे महत्त्व  कळले होते आपल्या दोन्ही मुलांना शिकवून सवरुन त्यांनी ज्या पद्धतीने घडविले ते फक्त एक आदर्श पिताच करू शकतो
नाही सोपे नसते एव्हडे हे त्या मागे ही मोठा त्याग आणि दुरदृष्टीच असावी लागते! कर्तुत्वाला कुठली ही जात आणि धर्म नसतो या पायाभारणीवर आमदार संजय जगताप यांचा प्रवास चालू आहे सहकार, शिक्षण, आणि, उद्योग यांचे जाळे ज्या पद्धतीने या जगताप परिवाराने विणून घट्ट केले आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही हजारो तरुणांना रोजगार देऊ अशा पोकळ गप्पा मारणे वेगळे आणि प्रत्यक्षात ते करणे यात जमीन अस्मानचा फरक असतो पुरंदर आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या निमित्ताने आपला पुरंदर पुन्हा नव्या जोमाने जगाच्या नकाशावर पोचवण्याचे काम पुरंदर तालुक्यातील व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री काम करणारे विजय शिवतरे यांनी केले आहे. आणि पुरंदरला आमदार संजय जगताप यांच्या रूपाने एक तरुण जगाच्या वाऱ्याची दिशा ओळख नारे नेतृत्व लाभले आहे. करोनाच्या वाईट काळात आमदारांनी स्वतःचा जीव धोक्यता घालून कुठल्याही प्रसिध्दीचा हव्यास न बाळगता जे काम केले आहे ते पुरंदरची जनता कधीच विसरणार नाही नेता तोच होतो जो लोकांच्या सुख दुःखात आधार देतो जनतेला शेवटी काय असते माझा पुरंदर काल ही ग्रेट होता आजही ग्रेटच आहे. आणि उद्याही ग्रेटच असणार आहे पुरंदरचा कॅलिफोर्निया केवळ कुणाची तरी भाषणे ऐकून कधीच होणार नाही!त्या साठी लागतील ते तुम्हां आम्हाचे एकजुटीने, प्रयत्न आणि नवी पिढी जागृत होत आहे. त्यांना भले बुरे कळते आहे आमदार संजय जगताप यांचा प्रवास, पैसा, प्रतिष्ठा, पद यांच्या पलीकडे सुरू झाला आहे उपभोगाच्या मर्यादा आणि बेड्या तोडून पुढे जाण्यासाठी जे जे काही लागते ते दान निसर्गानं म्हणा, नियतीने म्हणा की नशीबाने म्हणा त्यांच्या पदरात अगोदरच टाकले आहे.

Advertisement


करोनाच्या काटेरी युगा नंतरची आपली सर्वांची परिस्थिती खरेच वाईट आणि आपली सर्वांची कसोटी पाहणारी आहे!कुणाचा घडीचा भरावसा राहिला नाही.
शिवाजी अप्पा पोमण विठ्ठल अप्पा झेंडे सारखी हत्ती सारखी माणसे आपल्यातून निघून गेली राव होय हे देखील पुरंदरचे कोहिनुरच होते तुम्हीं प्रत्येक पुरंदरकर माझ्या साठी कोहिनूरच आहेत. अरे मजूर असो शेतकरी असो आपल्या सर्वांचे आपापल्या परीने योगदान या भूमीसाठी आहे आपल्या पूर्वजांनी नुसता या भूमी साठी घामच नव्हे तर वेळ प्रसंगी रक्त ही  सांडले आहे. पुरंदरचा तह ज्यात आपल्या शिवरायांचे 33 किल्ले गेले पण उमेद थोडीच गेली होती पुरंदरकर आणि पुरंदर कधीही हारत नसतो अगदी तहात सुद्धा आणि हेच आमचे बलस्थान आहे आणि ताकत सुद्धा!!
कवी.राजेंद्र सोनवणे, सोनोरी 9881611378

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *