ऋणानुबंधाच्या माध्यमातून सासवड पोलीस ठाण्यात रक्षाबंधन.
प्रतिनिधी अक्षय कोलते.
पुरंदर तालुक्यातील ऋणानुबंध संस्थेच्या वतीने सासवड पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. ऋणानुबंधाच्या सदस्यांनी नेहमीप्रमाणेच आजही पोलीस बांधवांना राखी बांधण्याचे काम केले आहे.
रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीमधील महत्वाचा सण मानला जातो.बहिणीने भावाला राखी बांधून त्याचे औक्षण करायचे असते.ऋणानुबंधच्या सदस्यांनी या सणाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत खऱ्या अर्थाने लोकांचे रक्षण करणारे पोलीस बांधव यांना राखी बांधून औक्षण केले आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील जिव्हाळा आश्रमातील वृद्धांना राखी बांधून औक्षण केले आहे.पोलीस बांधवांबरोबरच आश्रमातील वृद्धांसोबत जिव्हाळ्याचं नातं जपण्याचे काम केले आहे.गेली काही वर्षांपासून चालत आलेली ही परांपरा ऋणानुबंधने कायम ठेवली आहे.
यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणासाहेब घोलप ,रुपेेेश भगत , विनय झिंजुरके, जावळे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील महादेव कुटवड , श्रीकांत वढणे , राजेश भाटे,आदी पोलीस बांधवांना राखी बांधली आहे.
पोलीस बांधवांबरोबरच जिव्हाळा आश्रमात ऋणानुबंधच्या युवतींनी वृद्धांना राखी बांधून ऋण व्यक्त केले.
यावेळी ऋणानुबंधचे संचालक सुरज कुंभार,अंकिता लांडगे,पूर्वाराणी जगताप,देवानंद भालेराव,सायली कामथे,दर्शना भालेराव,व स्वाती रणावरे उपस्थित होते.