या तारखेला मा. खा. शरद पवार पुरंदर दौऱ्यावर

Share now

Advertisement

खा शरद पवार यांच्या हस्ते होणार स्मारकाचे उदघाटन 

Advertisement

सासवड ( प्रतिनिधी ) :-   दिवंगत लोकनेते सहकाररत्न चंदुकाका जगताप यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी, दि ११ जून रोजी दुपारी ३ वाजता सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ” चंदुकाका जगताप स्मारक” आणि शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सीबीएसई विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Advertisement

   स्वर्गीय चंदूकाका जगताप मित्र परिवार आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्मारकामध्ये स्व चंदुकाका जगताप यांच्या १० फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तसेच स्मारकातील स्व चंदुकाका जगताप यांच्या जीवनकार्य व प्रवासातील विविध प्रसंगाबाबतची छायाचित्रांसह माहितीच्या दालनाचे आणि ऑडीटेरीयमचे तसेच 

Advertisement

सीबीएसई माध्यमाच्या नवीन इमारतीचे उदघाटन होत आहे. पोस्टाच्या विशेष अधिकृत आवरणाचे ( लिफाफा ) 

Advertisement

आणि ” जनक” नावाने प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेचे अनावरण यावेळी करण्यात येईल. त्याचप्रमाणे भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १ हजार मुलींच्या पाॅलिसीचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण खासदार पवार यांच्या हस्ते होईल. 

Advertisement

   कार्यक्रमास पंजाब राज्याचे विधानसभा अध्यक्ष सरदार कुलतारसिंग संधवान, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार गिरीश बापट, खासदार गजानन कीर्तिकर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, दादा जाधवराव, आमदार दिलीपराव देशमुख, भाई जगताप, गिरीश चौधरी, विक्रमसिंह सावंत, पंजाबचे आमदार जयकिशनसिंग रोडी, कुलवंतसिंग पंडोरी, अमरजीतसिंग संधवा आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली. तसेच या सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चंदूकाका जगताप मित्र परिवार आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आमदार संजय जगताप यांनी केले.

Advertisement

     यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, प्रदीप पोमण, सुनिता कोलते, संजय चव्हाण, वामनतात्या जगताप, सागर जगताप, संभाजी जगताप, विठ्ठल मोकाशी, संतोष गिरमे, संदीप फरतडे, विकास इंदलकर, आदी उपस्थित होते.

Advertisement

चौकट…….स्व चंदुकाका जगताप यांचे कार्य * संत सोपानकाका सहकारी बँकेची स्थापना. १८ शाखा, १ हजार कोटींच्या ठेवींकडे वाटचाल  * श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ स्थापना. २२ शाखा * पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था स्थापना. १३ शाखा ५०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल * शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठान *इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्था * पुरंदर मिल्क अँड ऍग्रो प्रो लि., कोल्ड स्टोअरेज, पेट्रोलियम * सासवडचे १२ वर्षे नगराध्यक्ष * विधानपरिषदेवर आमदार पद भूषविले * महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद भूषविले ( मंत्री दर्जा ) * १९८५ ते २०१८ पर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक * १९८५ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविले. 

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.