शिवतारे यांच्या स्वीय सहाय्यकावर तक्रार दाखल

Share now

Advertisement

माजी मंत्री विजय शिवतारे यांचा स्वीय सहाय्यक म्हणून तालुक्याला परिचित असणारे माणिक निंबाळकर रा. एखतपुर ता पुरंदर व किरण पोटे रा नारायणपुर ता पुरंदर यांच्या वर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पत्रकार निलेश जगताप यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे.
पत्रकार म्हटले की वास्तवाता आणि पारदर्शक लिखाण यांमुळे समाजातील अनेक बडे प्रस्थ पत्रकारांचे शत्रू बनत असतात. शिवतारे यांच्या भोंगळ कारभाराच्या बाबत आवाज उठवल्याने स्वीय सहायक निंबाळकर व पोटे यांनी निलेेेश जगताप यांच्यावर आगपाखड करायला सुरुवात केली होती. सोशल मीडियावर पत्रकार हरवले आहेत , जागतिक कीर्तीचे नोबेल पुरस्काराचे पत्रकार !, पुरंदर भूषण पत्रकार अशा उपमा देत निलेश जगताप यांच्या नावानिशी व फोटोसाहित पोस्ट व्हायरल केल्याने जगताप यांनी पोलिसांकडे दाद मागितली आहेे . यावर माणिक निंबाळकर व किरण पोटे यांच्यावर भारतीय दंडविधान कायदा 1860 च्या कलम 501 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

पत्रकारांना हवे संरक्षण अन न्याय –
पत्रकारांवर होणारे हल्ले रोखणे, त्यांना सन्मानाची वागणूक देणे यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी काळाची गरज बनली आहे. स्वतःचे अस्तित्व पणाला लावून सेवा करणाऱ्या पत्रकारांची बदनामी करणाऱ्यांना वठणीवर आणायला हवे असे मत प्रसिद्धिप्रमुख भरत निगडे यांनी व्यक्त केले.

Advertisement

आम्ही न्यायालयात जाणार –
बदनामी केल्याने मी व्यथित झालो असून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेे. परंतु, त्याचबरोबर मंत्रिपदाच्या काळात निंबाळकर याने केलेले गोरख धंदे बाहेर आणणार आहे आसे निलेश जगताप यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.