त्या बेवारसाचा खुन ःः दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल ःः एक महिला जखमी ःः तर शवविच्छेदनाचा आहवाल संशयाच्या भोवर्यात
सासवड ःः पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका वाईनच्या दुकानासमोर दिनांक चोवीस मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. असे पोलिसांकडून सांगितलं जात होतं. मात्र या नंतर आता या प्रकरणी नवीन माहिती उजेडात आल्याने या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे, अर्थात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याच मारहाणीत जखमी झालेला आणि उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला प्रकरणी सुद्धा कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका महिलेचा हात मोडल्या मुळे ३२६ चा गुन्हा आरोपी निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप रा.ताथेवाडी सासवड ता.पुरंदर जि.पुणे याच्या विरोधात फिर्यादी सुनिल रामचंद्र चिखले वय 55 सहा पोलीस उपनिरीक्षक सासवड पोलीस स्टेषन पुणे यांनी दाखल केला आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,. दि. 24/05/2022 रोजी अकस्मात मयत नं.35/2022 सीआरपीसी 174 हे पोलीस स्टेषनला दाखल करण्यात आले होते. त्या मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा सहा.फौजदार डी.एल.माने यांनी केला व पुढील तपास कामी कागदपत्र माझेकडे दिले. मी भोंगळे वाईन्स च्या बाजूला ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी भेट दिली. आजुबाजूच्या लोकांकडून मयत व्यक्तीच्या नावाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु ओळख पटली नाही. घटनास्थळाच्या बाजूस काम करणारे सुनिल रामचंद्र मुळीक यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, दि.23/05/2022 रोजी दुपारचे वेळेस कटटयावर बसलेल्या कचरा गोळा करणा-या लोकांना पप्पु जगताप हा काठीने मारहान करत होता. पप्पु जगताप हा त्याठिकाणी अंडाभुर्जीची गाडी लावतो. त्याच ठिकाणी हे कचरा गोळा करणारे लोक बसलेले उठत नव्हते म्हणून तो त्यांना मारहान करून उठवत होता.
त्या ठिकाणी नेहमी बसणारे एक वयस्कर आजोबा वय अंदाजे 60 वर्षे, एक अनोळखी पुरूष वय अंदाजे 50 वर्षे तसेच माझे ओळखीच्या शेवंताबाई जाधव रा.सासवड वय अंदाजे 60 वर्षे यांना माझे समोर एका बांबुच्या काठीने बेदम मारहाण केली. मारहाण केल्या नंतर हे तिघेजण तेथेच पडुन होते. थोडयावेळाने पुन्हा हे त्याजागेवरून उठत नाही म्हणून पप्पु जगताप याने त्याच्या हातगाडीवरील उकळते पाणी त्या अनोळखी पुरूष वय अंदाजे 50 वर्षे याच्या अंगावर टाकले. त्यावेळी तो मोठयाने ओरडला. आजुबाजूचे दुकानातील लोक त्या ठिकाणी त्या वेळी गोळा झाले होते.
त्यानंतर दि.24/05/2022 रोजी पप्पु जगताप याने त्याची हातगाडी लावली तेव्हा देखील मयत व्यक्ती त्या ठिकाणावरून उठत नाही म्हणून पप्पु जगताप याने त्यास तळपायावर बेदम मारहाण केलेली मी पाहिले. त्यावेळी मयत व्यक्ती त्या ठिकाणी तडफडत होता. त्यानंतर साधारण रात्री 20.00 वा.चे.दरम्यान तो अनोळखी इसम निपचीत पडून होता. त्यानंतर त्याला ऑम्बुलन्समध्ये घेवून गेले.
नंतर मला समजले की, तो मयत झाला आहे. आज दि.30/05/2022 रोजी मला समजले की, सदर ठिकाणी पप्पु जगताप याने मारहाण केलेले आजोबा देखील ससून येथे उपचार घेताना मरण पावले आहेत. पप्पु जगताप याने केलेल्या मारहाणीमुळे शेवंताबाई जाधव यांच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे इतर साक्षीदार लक्ष्मीकांत नाथ्याबा कदम व शेवंताबाई जाधव हे देखील मारहाण झाल्याचे सांगत आहेत. मारहान करणा-या इसमाचे नाव निलेष उर्फ पप्पु जयवंत जगताप रा.ताथेवाडी सासवड ता.पुरंदर जि.पुणे असे आहे.
एकंदरीत झाले तपासावरून दि.23/05/2022 रोजी व दि.24/05/2022 रोजी निलेष उर्फ पप्पु जयवंत जगताप याने भंगार गोळा करणारे एक अनोळखी पुरूष वय अंदाजे 50 वर्षे व दुसरा अनोळखी पुरूष वय अंदाजे 60 वर्षे यास हातगाडीच्या जवळून उठून लावण्यासाठी बेदम मारहाण केली, हातावर गरम पाणी टाकले. त्याने केलेल्या मारहाणीमुळे सदरचे दोन्ही अनोळखी व्यक्ती मरण पावले. तसेच शेवंताबाई सखाराम जाधव वय 65 वर्षे रा.खंडोबानगर सासवड हिच्या हातावर लाकडी काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. म्हणून माझी निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप रा.ताथेवाडी सासवड ता.पुरंदर जि.पुणे याचे विरूध्द कायदेषीर फिर्याद आहे.
……………..
शवविच्छेदनाच्या आहवाल संशयाच्या भोवर्यात आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आसला तरी सासवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचा आहवाल हा आशक्त पणा व लिव्हरवर सुजया कारणाने मुत्यू झाला आहे असा आहे. आता आहवाल संशयाच्या भोवर्यात आडकला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप करीत आहेत.