तो मृत्यू उपासमारीने चर्चांना पूर्ण विराम

Share now

Advertisement

सासवड (ता.पुरंदर) येथे सापडलेल्या त्या बेवारस मृतदेहाच्या आंगवर गरम पाणी टाकल्याची चर्चा होती. मात्र  शवविच्छेदन अहवालामध्ये उपासमारीने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले असल्याने ही चर्चा निष्फळ ठरली आहे. अशी चर्चा सध्या. तालुक्यात आहे.

Advertisement

       येथे दिनांक २४ मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा  मृतदेह आढळून  आला होता. या व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. मात्र हा घातपात असावा अशी चर्चा सासवड शहरात दबक्या आवाजात रंगली होती. आता त्याचा शोध कार्याबाबतचा तपास लावण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Advertisement

      सासवड शहरात दिनांक २४ मे रोजी एका अनोळखी व्यातीचा मृत्यू   आढळून   झाला होता. सुरवातीला तो दारू पिलेला असावा असे समजून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र रात्री नऊ वाजालेच्या सुमारास या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. आणि  हा मृत देह शवविच्छेदनासाठी सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या नंतर या बाबतचा तपास सासवड  पोलीस करीत आहेत. दारु पिल्याने व अनेक.

Advertisement

दिवस उपाशी राहिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मात्र या मृत व्यक्तीच्या हातावर भाजलेली जखम होती. अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळत आहे. त्याच बरोबर या व्यक्तीसह अन्य दोन व्यक्तींना एका व्यक्तीने मारल्याचे ते तिघेही जखमी झाल्याची व यातच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची चर्चा रंगली होती. काही लोकांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर का घातपात असल्याची व मारहाणीत गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.असावा अशी शंका बोलून दाखवली होती.

Advertisement

     या व्यक्तीच्या मृत्यू नंतर या भागातील इतर भिकारी गायब झाल्याने याबाबतचा संशय बळावला आहे.या भिकर्या पैकी महिलेचा हात मोडला असून तिच्या हाताला प्लॅस्टर करण्यात आले होते. काही  नागरिकांना बरोबर बोलताना या महिलेने मारहाण झाल्याचे म्हटले होते. मात्र आता याबाबतचं सत्य सांगण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे जरी या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक झाला असे म्हटले जात असले तरी. या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून या बाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *