आमदार गोपिचंद पडळकर यांचा पुरंदर मधील अधिकाऱ्यांवर घाणाघात व्हिडीओ पहा……
शेतकऱ्यांच्या जमिनीत बेकायदेशीर टावर उभे कराल तर याद राखा ःः गोपीचंद पडळकर
सासवड (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जर महावितरण टॉवर टाकले तर याद राखा तुमच्या मंत्र्याच्या दालनात मी ठाण मांडून बसले तुम्ही इकडे काही घोटाळा केला तर तिकडे मंत्रिमहोदय अडचणीत येतील. तर पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी देखील पैसे भरून घेताना चुकीच्या पद्धतीने पैसे भरून देऊ नयेत चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांकडून वसूल करून घ्याल तर तर तुमच्या विरोधात देखील आम्हाला आवाज उठवावा लागेल. असा इशारा विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
सासवड (ता पुरंदर) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जन आक्रोश आंदोलन आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे बोलत होते ते पुढे म्हणाले, प्रांताधिकारी चुकीच्या पद्धतीने निकाल देत आहेत गोरगरिबांच्या जमीनीवर पवारांचं ऐकून हे प्रांत नांगर फिरवत आहेत. एक पोल्ट्री बंद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रांतांना पत्र दिले होते. यावर प्रांतांनी या पोल्ट्री मुळे माशा तयार होतात व गावकऱ्यांना त्रास देतात असा अहवाल दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार येईल त्यावेळी यांना वाचवायला कोणी येणार नाही. याचे भान अधिकाऱ्याने ठेवले पाहिजे. पुरंदरच्या आमदारांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, मला निवडून दिले तर गुंजवणीची योजना स्वखर्चाने पूर्ण करील यांनी ही योजना पूर्ण केली का? या सरकारने ओबीसीचे आरक्षण घालण्याचे काम केले आता यापुढे ओबीसी समाजाच्या पोरांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उभे राहता येणार नाही या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे आरक्षण गेले हे सरकार केंद्र सरकारच्या नावाने इंपेरिअलडेटे दिला नाही म्हणून आरक्षण गेले.
हे सरकार विश्वासघाताने आलेले सरकार आहे. सरकर मराठा व ओबीसी समाजाविरुद्ध आहे. मराठा समाजाचे व ओबीसी चे आरक्षण या सरकारने घालवले. ओबीसींचा या सरकारने विश्वास घात केला. शेतकऱ्यांना या सरकारने दमडा दिला नाही. पुरंदरची ही ऐतिहासिक भूमी आहे. या पुरंदरच्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते ही शोकांतिका आहे. करोणा काळामध्ये शेतकऱ्यांची लाईट बिल माफी या सरकारने केले नाही. उलट या काळात या सरकारने शेतकऱ्यांची लाईट तोडली आसे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.
महा विकास आघाडी सरकारने विजेचा खेळ सुरू केला आहे. हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. चुकीची बिले शेतकऱ्यांनी भरू नयेत असे किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेतून अधिकारी भ्रष्टाचार करत आहे. वेळेत उसाची तोड न मिळाल्यामुळे टनेज मध्ये शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. व चांबळी येथील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा. प्रांत शेतकऱ्यांना फसवण्याचे काम करीत आहेत. तर पोलीस स्टेशनला काँग्रेसचा एक कार्यकर्ता बसून असतो त्या कार्यकर्त्यांला विचारल्याशिवाय गुन्हे दाखल होत नाही हि देखील खंत यावेळी प्रास्ताविकातून पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी व्यक्त केली.
कोट……
कात्रज डेअरीच्या निवडणूकीत गंगाराम जगदाळे यांना दोनच मुले आससताना देखील याथील पदाधिकाऱ्यांनी तिसर्या मुलाचा कागद आणून दिला. त्यांच्याच नावाचा भोरमध्ये कोणीतरी माणूस आहे. तिसऱ्या मुलाचे गाव भोर तालुक्यातले दाखवले आई वेगळी बाप वेगळेच जात वेगळीच त्या मुलाचे वडील वारलेले आहेत. उमेदवारी आर्ज भरताना प्रतिज्ञापत्र दाखल करून देखील ज्या अधिकाऱ्यांनी हा उमेदवारी अर्ज बाद केला आहे. त्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सत्तेचा गैरवापर करून उमेदवारी अर्ज बाद केला आहे असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले
यावेळी ओ बी सी आघाडी अध्यक्ष योगेश टिळेकर, किसान मोर्चा अध्यक्ष वासुदेव काळे, तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश जगताप, प.महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, श्रीकांत राऊत, निलेश जगताप, कैलास जगताप,रवींद्र फुले, सचिन लंबाते , ॲड शिवाजी कोलते, जालिंदर जगताप, गिरीश जगताप , मैनाताई जाधव, हवेली तालुका अध्यक्ष धनंजय कामठे,पंडित मोडक, सरपंच स्नेहल दगडे, अलका शिंदे. आदी उपस्थित होते
प्रास्ताविक गंगाराम जगदाळे यांनी केले तर सूत्रसंचालन गिरीश जगताप यांनी केले व आभार श्रीकांत ताम्हाणे यांनी मानले.
सासवड (ता पुरंदर) येथे आ. गोपिचंद पडळकर बोलत आसताना.