नारायनपुर येथुन उत्तराखंड कडे दत्तमूर्तीचे मिरवणुकीने प्रस्थान

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) ःः सासवड (ता. पुरंदर) येथील श्री क्षेत्र नारायणपूर ते सासवड अशीच ढोल-ताशांच्या गजरात दत्त मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीची सांगता सासवड नगरपालिके समोर झाली. यावेळी उत्तराखंडकडे जाणाऱ्या भाविकांना पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

         सासवड वरुन जेजुरी मार्गे पाटस, भीमा नदी, घोडनदी,  कुरकुंडी, सुपा, राहुरी, शिर्डी, मनमाड, मुंबई आग्रा हायवे, मालेगाव, धुळे, तापीनदी, नर्मदानदी, शिंप्रीनदी, आग्रा भोपाळ बायपास, पार्वती नदी, धैलपुर टोलनाका, यमुनानदी या मार्गे श्रीक्षेत्र आत्री दत्त धाम उत्तराखंड ठिकाणी जाईल. 

Advertisement

      भिवडी ग्रामस्थांच्या वतीने दत्त मूर्तीचा आणि नारायण महाराजांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी वडापाव आणि पाण्याची सोय आली होती. तर मोठ्या जल्लोषात स्वागत करुन रांगोळी काढून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर उत्तराखंड मधील श्रीक्षेत्र अत्री या ठिकाणी २२ तारखेला कलशारोहणचा व मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने मंदिराची उभारणी केली गेली दोन वर्षे मंदिराची उभारणी चालू होती. आता ती पूर्णत्वास गेली असल्याची महिती तात्यासाहेब भिंताडे यांनी दिली. 

Advertisement

      नारायण महाराज यांच्या संकल्पनेतून वीस वर्षापासून चारधामचे काम सुरू होते ते काम पूर्णत्वास येत आहे. आज चौथ्या धामाचे काम पूर्ण होऊन त्याच्या कलशा रोहनाचे काम २२ तारखेला होणार आहे. नारायण महाराजांनी मांडलेली संकल्पना पूर्णत्वास जात आहे. याचा पुरंदर वासियांना अभिमान आहे. अण्णांच्या या कामामुळे पुरंदरचे नाव चिरतरूण चिरंतर राहणार आहे. याचे भाग्य पुरंदर वासियांना असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

Advertisement

         यावेळी आमदार संजय जगताप तात्यासाहेब भिंताडे, विठ्ठल मोकाशी, प्रदीप पोमण, सुनिता कोलते, संजयनाना जगताप, बबन टकले, रवींद्र ताकवले, अण्णा खाडे, बंडूकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, दत्ता झुरुंगे, रामदास मेमाणे, बाळासाहेब दाभाडे, अंकुश जगताप, बापूसाहेब म्हेत्रे,  श्रीनाथ बोरकर, नारायणपूरचे सरपंच चंद्रकांत बोरकर, प्रदीप बोरकर, अशोक जगदाळे, दादा भुजबळ, नंदकुमार जगताप संतोष गिरमे, संभाजी जगताप आदी उपस्थित होते. 

Advertisement

      श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर यांच्या वतीने संपूर्ण रांगोळी काढण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत क्षीरसागर यांनी केले. तर आभार रामभाऊ बोरकर यांनी मानले. सूत्रसंचालन एम.के गायकवाड यांनी केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.