आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर ःः दोन दिवस महिलांना ठेवले उपाशी
बेलसर :- बेलसर (ता पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शुक्रवार (दि.१३) रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया म्हणजेच लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिराचे (बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया) आयोजन करण्यात आले होते. परंतु आरोग्य विभागाच्या गलथान नियोजनामुळे महिलांना शस्त्रक्रिया न करता माघारी जावे लागले आहे. प्रमुख्याने दिवसभर उपाशी असलेल्या महिला आणि काही आधीच्या दिवशी उपाशी असलेल्या महिलांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे महिलांना मनस्ताप सहन करून माघारी परतावे लागले प्राथमिक आरोग्य केंद्राचा त्याचबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पुरंदर तालुक्यामधून साधारणतः शंभर महिला शस्त्रक्रिया करण्यासाठी बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. प्रामुख्याने परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्र, वाल्हे, नीरा, माळशिरस, बेलसर या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या महिलांची शस्त्रक्रिया आज होणार होती. परंतु शंभर उपस्थित महिलांपैकी फक्त 46 महिलांचे शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु दोन दिवस उपाशी असलेल्या महिला यांना त्रास सहन करावा लागला आहे.
जिल्ह्यामध्ये प्रमुख्याने तीन सर्जन शासन मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ पाहावयास मिळते. सर्जन यांच्या सांगण्यानुसार लिमिटेड शस्त्रक्रिया घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली, त्यानंतर तालुक्यातील सर्व पीएचसीला प्रत्येकी दहा पेशंट बेलसर येथे आणावयास सांगितले होते, परंतु पीएचसी च्या अधिकाऱ्यांनी अधिकचे पेशंट बेलसर येथे आणल्याने ही सद्यस्थिती उद्भवली आहे. असे प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर यांच्या वतीने सांगण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने अधिकचे पेशंट आणल्यामुळे बेलसर येथे पेशंटची संख्या वाढली असे मत तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे यांनी दीली. परिंचे येथून ३० ते ४०, वाल्हे येथुन १०, निरा येथून १०, बेलसर येथून ७३,तर माळशिरस येथुन १० एवढे पेशंट दाखल झाले होते. त्यासोबतच तालुक्यातील ज्या महिलांना शस्त्रक्रिया करावयाची होती अशा महिलाही न बोलवता उपस्थित झाल्या होत्या त्यामुळे उपस्थितांची संख्या अधिक वाढली.
अपुऱ्या स्टाफ मुळे ढिसाळ नियोजन झाल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे रिक्त जागा भरण्याची मागणी केली जात आहे. सर्जन यांच्या बदललेल्या नियोजनामुळे सदर पेशंटला त्रास सहन करावा लागला आहे असल्याची चर्चा परिसरात होती.
आज शस्त्रक्रियेसाठी तालुक्यातून 50 रुग्णांची नोंदणी झाली होती झाल्यामुळे सद्यस्थिती ओढावली. बरेचसे पेशंट्स न बोलता आले होते. एकूण शंभरच्या आसपास पेशंट शस्त्रक्रिया साठी आले होते परंतु सर्जन यांनी 50 महिलांची शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितल्याने अतिरिक्त वाढलेले पेशंट परत पाठवण्यात आले.
सागर डांगे आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर