माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नारायणपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठमोठे खुलासे
सासवड (प्रतिनिधी) शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना या देशात वेगळे स्थान आहे. संकटाच्या काळात तोंड कसे द्यायचे. हे त्यांच्याकडून आपण शिकलो. तीनशे ते चारशे वर्ष झाले त्यांचा हा आदर्श लोकांच्या समोर आहे. संकटाची कसलीही मालिका आली तरी ताकतीने उभे राहण्याची भूमिका संभाजी महाराज यांनी घेतली.
त्यावेळी त्यांचे वास्तव चित्र मांडणे गरजेचे होते. ते मांडले जात नाही याची खंत व्यक्त शरद पवार यांनी व्यक्त केली. पन्हाळा पुरंदर राजगड शिवनेरी यांचा इतिहास योग्य पद्धतीने मांडला जावा काही लोक इतिहासाचे विचित्रीकरण करीत आहेत. यातुन समाजाची भावना उद्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरा इतिहास तुम्ही फक्त लोकांच्या पुढे मांडला पाहिजे.
नारायण पेठ (ता. पुरंदर) येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्याच्या पाहणीनंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषद सांगितले
शरद पवार पुढे म्हणाले की, पुरंदर किल्ल्याचा इतिहास मोठा आहे. सध्या हा किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. लष्कराने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या आहेत. यात राज्य सरकारने हातभार लावला पाहिजे. रायगड शिवनेरी प्रमाणे पुरंदर कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
*श्रीलंकेत सध्या जाळपोळ आहे. पण भारताची यासंदर्भात काय परिस्थिती असू शकते*
आपल्याकडे जमेची बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्य घटना व भारताचे संवेधान. त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. पण श्रीलंकेत राजकीय लोकांच्या हातातुन सत्ता गेली आहे. त्यामुळे लोक आता रस्त्यावर आहेत. आपल्या देशात लोक जागृत आहेत. याबाबतचे उदाहरण देताना इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकांनी इंदिरा गांधींचा पराभव केला. नंतर दोन वर्ष सत्तेत असणार्या लोकांना देश चालवता आला नाही म्हणून पुढील निवडणुकीत लोकांनी पुन्हा इंदिरा गांधींना बहुमताने निवडून दिले.
२९ तारखेला नितीन गडकरी बारामतीत*
कृषी क्षेत्रातल्या जाणकार लेखांची परिषद बारामती येथे होणार आहे. त्यासाठी गडकरी यांना निमंत्रित केलेले आहे. यासाठी ते येत आहेत. ते येत असल्याची संभाजी महाराजचा खरा इतिहास लोकांच्या पुढे मांडला पाहिजे. शरद पवार