पुरंदर किल्ल्याला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांंची भेट ःः काय म्हणाले पवार साहेब ते पहा…..

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) लेखणीचा गैरवापर करून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रविण गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतिहासाचा मागोवा घेत सर्वसामान्य जनतेला शिवशंभो छत्रपतींचा इतिहास सांगण्याचे कार्य केले. या प्रेरणादायी इतिहासाचे कार्य असेच पुढे चालू ठेवावे. भारतीय लष्कराने किल्ले पुरंदरवर अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याबद्दल भारतीय लष्कराचे जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. असे प्रतिपादन माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी केले.

Advertisement

किल्ले पुरंदर येथे होत आसलेल्या 14 मे 2022 रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साजऱ्या होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर किल्ले पुरंदरची पाहणी व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आले होते यावेळी ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, देशातील अठरापगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रयतेच्या मदतीने स्वराज्याच्या शत्रूशी जबरदस्त संघर्ष करत स्वराज्य रक्षण करण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी केले

Advertisement

किल्ले पुरंदर येथे लष्कराच्या वतीने सभागृह बांधण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली आहे. तसेच लष्कराच्या वतीने गडावर अनेक विकास कामे केली आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी देशभर व राज्यभर सुरू असलेल्या परिस्थिती संदर्भात भाष्य करून संभाजी ब्रिगेडची रोखठोक भूमिका स्पष्ट केली.

Advertisement


यावेळी आमदार संजय जगताप ,राष्ट्रवादीचे नेते प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे संभाजी झेंडे, विजय कोलते, दत्तात्रय झुरंगे, प्रशांत पाटणे, निलिनी लोळे, सुनिता कोलते, गौरी कुंजीर कुमुदिनी पांढरे, मंगल म्हेत्रे, नीता सुभागडे, प्रदिप पोमण, बबूसाहेब माहूरकर, दत्ताआबा चव्हाण, माणिकराव झेंडे पाटील, जयदीप बारभाई, मयुर जगताप, बंडूकाका जगताप , सुनील कुंजीर, गौरव कोलते, आदींसह विविध संस्था संघटनांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement


कार्यक्रमाचे संयोजन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, कार्याध्यक्ष सुधीर भोसले, उपाध्यक्ष छगन शेरे, प्रदेश संघटक अमोल काटे ,पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत ,कार्याध्यक्ष संतोष हगवणे ,पुरंदर तालुका अध्यक्ष सागर जगताप, सासवड शहराध्यक्ष गौरव जगताप, जेजुरी शहराध्यक्ष संदीपआप्पा जगताप ,संघटक आनंद जंगम, दादा खाटपे, फलटण अध्यक्ष शंभू सिंह नाईक-निंबाळकर आदीसह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

Advertisement


प्रास्तविक अजयसिंह सावंत यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. आभार संतोष हगवणे यांनी मानले.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.