जमिनीच्या वादातून टॉमेटो पिकाची नासधूस

Share now

Advertisement
   महिलेसह मुलीला जिवे मारण्याची धमकी

परिंचे (प्रतिनिधी)

Advertisement

श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे जमिनीच्या वादातून रामचंद्र मच्छिंद्र वायगंड यांनी साथिदारांसह बारा गुंठ्यांत असलेले टॉमेटोचे पिक उपटून टाकले आहे.या बाबत रोहिदास बबन वायगंड यांनी सासवड पोलिस स्टेशन मध्ये रामचंद्र मच्छिंद्र वायगंड व साथिदारां विरोधात तक्रारी अर्ज दिला असून अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सासवड पोलिस स्टेशन मधील पोलिस नाईक दत्तात्रय सरक यांनी सांगितले आहे. ऐन जोमात आलेला टॉमॅटोचा फड उपटून टाकल्या मुळे परिसरातील शेतकरी हळहळ व्यक्त केली आहे.
रोहिदास बबन वायगंड या शेतकऱ्याची वीर तोंडल रस्त्यालगत स्वताच्या मालकीची गट नंबर ७८६ ही बारा गुंठ्यांची जमीन आहे.सोमवारी (दि.५) रोजी रामचंद्र मच्छिंद्र वायगंड, इंदुबाई मच्छिंद्र वायगंड,मंदा बाळासाहेब होले, अनिता विनायक जगताप, सुनंदा वसंत धसाडे,रतन संजय नवले यांच्या जमावाने सकाळी अकरा वाजता शेतातील टॉमेटोचे पिक उपटायला सुरवात केली.रोहिदास व सुजाता या दांपत्याने विनंती करून देखील बळजबरीने जमीनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. कष्ट करून उगवलेले पिक डोळ्यासमोर उपटून टाकत असल्यामुळे या दांपत्याला अश्रू अनावर झाले नाहीत.
टॉमेटो पिकाची नासधूस करताना शेतात बांधलेल्या तारा,खांब, ठिबक सिंचन, पाईप लाईन यांचेही नुकसान केले आहे. टॉमॅटो उपटून टाकणारे रामचंद्र मच्छिंद्र वायगंड यांना विचारले असता सदर जमीन माझीच असून मीच टॉमेटो लागवड केली होती. टॉमेटोला बाजारभाव नसल्याने उपटून टाकत असल्याचे सांगितले.जमीनीच्या कागदपत्रा विषयी विचारले असता माझ्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. रोहिदास वायगंड यांच्या नावाने सर्व कागदपत्र असल्याचे पहायला मिळाले ही घटना पहाण्यासाठी आलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी मात्र हातातोंडाशी आलेले पिक उपटून टाकत असल्याने हळहळ व्यक्त केली यावेळी शैलेश तांदळे, तानाजी धुमाळ, मधूकर धसाडे, बबन धसाडे, सदाशिव लोखंडे, सचिन तांदळे, सुर्यकांत वायगंड आदी शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *