चक्क १ मिनिटे ५० सेकंदात २७ वस्तूची मिळुन २८ लाख ८४ हजाराहुन अधिक किमतीचे दागदागिने व रोकड लंपास व्हिडीओ पहा…..
सासवड ःः सासवड शहरातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण सासवड शहर व पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे . सासवड शहरातील दाट लोकवस्ती असणार्या सोपाननगर हाडको परिसरात भर दुपारी दिवसा-ढवळया बंद घराचे कुलुप तोडून तब्बल २८ लाख, ८४ हजार,३०० रुपये किमतीच्या दागिने आणि रोख रक्कम दोन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे . यासंदर्भात ज्ञानेश्वर लक्ष्मण सुभागडे,वय 62 वर्षे,व्यवसाय इलेक्ट्रीक रिपेरींग दुकान, रा.सुशिलानंद सोसायटी,सोपाननगर हाडको,सासवड,ता.पुरंदर,जि.पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ता.08/04/2022 रोजी दुपारी 12.00 वा. ते. 1.30 वा.चे.दरम्यान माझे सुशिलानंद सोसायटी सोपाननगर हाडको,सासवड येथील बंद घराचे कुलुप कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कशाचे तरी सहाय्याने तोडुन आत प्रवेश करुन 28,84,300/- रुपये किंमतीचा वरील वर्णनाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे म्हणुन माझी त्या दोन अज्ञात चोरटयांविरुध्द फिर्याद आहे.
1) 3,60,000/- रुपये किंमतीचे 7.5 तोळे वजनाचे मणीमंगळसुत्र2) 2,88,000/- रुपये किंमतीचा 6 तेळे वजनाचा राणीहार3) 1,20,000/- रुपये किंमतीचा 2.5 तोळे वजनाचा नेकलेस4) 2,88,000/- रुपये किंमतीचे 6 तोळे वजनाचे 2 तोडे5) 1,20,000/- रुपये किंमतीची 2.5 तोळे वजनाची गरसोळी6) 72,000/- रुपये किंमतीच्या 1.5 तोळे वजनाच्या वेडयाच्या तीन अंगठया प्रत्येकी 5 ग्रँम वजनाच्या7) 1,00,000/- रुपये किंमतीच्या 2.1 तोळे वजनाच्या खडयाच्या तीन अंगठया,प्रत्येकी 7 ग्रँम वजनाच्या8) 48,000/- रुपये किंमतीची 1 तोळे वजनाची खडयाची अंगठी9) 56,000/- रुपये किंमतीची 1.2 ग्रँम वजनाची डी.एल.सुभागडे लिहीलेली अंगठी
10) 36,000/- रुपये किंमतीच्या 8 ग्रँम वजनाच्या 2 लेडीज अंगठया,प्रत्येकी 4 ग्रँम वजनाच्या11) 36,000/- रुपये किंमतीच्या 8 ग्रँम वजनाच्या लहान मुलांच्या 4 अंगठया,प्रत्येकी 2 ग्रँम वजनाच्या12) 12,000/- रुपये किंमतीचे 3 ग्रँम वजनाचे एक बदाम पान13) 1,92,000/- रुपये किंमतीच्या 4 तोळे वजनाच्या दोन पाटल्या14) 1,68,000/- रुपये किंमतीची 3.5 तोळे वजनाची एकदानी माळ15) 1,92,000/- रुपये किंमतीचे 4 तोळे वजनाचे कानातले सहा जोड16) 1,68,000/- रुपये किंमतीचा 3.5 तोळे वजनाचा गळयातील गोफ17) 72,000/- रुपये किंमतीची 1.5 ग्रँम वजनाची मोठी चैन18) 32,000/- रुपये किंमतीची 7 ग्रँम वजनाची डिझाईन चैन19) 28,000/- रुपये किंमतीची 6 ग्रँम वजनाची लहान चैन
20) 72,000/- रुपये किंमतीचे 1.5 तोळे वजनाचे कानातील दोन जोड21) 48,000/- रुपये किंमतीची 1 तोळे वजनाच्या दोन नाकातील नथ,प्रत्येकी 5 ग्रँम वजनाच्या22) 36,000/- रुपये किंमतीचे 8 ग्रँम वजनाचे कानातील तुटलेले टॉपस 23) 6,500/- रुपये किंमतीचे 100 ग्रँम वजनाचे चांदीचे पैंजनाचे 2 जोड24) 6,500/- रुपये किंमतीची चांदीची 100 ग्रँम वजनाची लक्ष्मीची मुर्ती25) 3,000/- रुपये किंमतीचे चांदीचे 50 ग्रँम वजनाचे 4 लक्ष्मी कॉईन26) 300/- रुपये किंमतीचे चांदीचे उदबत्तीचे घर27) 3,00,000/- रुपये रोख रक्कम 500 रुपये व 200 रुपये दराच्या नोटा—————————— एकुण – 28,60,300/- पुढील तपास पोलिस.निरीक्षक आण्णासाहेब घोलप करीत आहेत.