गुरुजी तुम्हाला पुळका असेल तर तुम्ही द्या गणवेश
तालुक्यातील एका शाळेतील घडलेला प्रकार माहे मार्च 2022 मध्ये तालुक्यातील शाळातील सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती जमाती ची मुले, दारिद्र्यरेषेखालील मुले यांना प्रत्येकी एक गणवेश याप्रमाणे गणवेश खरेदीचे पैसे शाळांच्या खात्यावर पाठवण्यात आले. जमा झालेला गणवेश निधी सातच दिवसात खर्च करायचा होता. शाळातील गुरुजींची गणवेश खरेदीसाठी धावपळ झाली. एका शाळेतील गणवेशापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी येथील गुरुजींनी ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीच्या मार्फत गणवेश देण्याची विनंती केली.
सासवड शहरातील रोड रोमीओची संख्या वाढली
एक प्रतिष्ठित दुकानदार शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे घेण्यासाठी शाळेत आले. शाळेतील लाभार्थी विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे घेण्यात आली. शाळेतील गणवेशापासून वंचित राहिलेल्या मुलांना गणवेश देण्याची आठवण संबंधित गुरुजींनी सदस्यांना फोन करून दिली. संबंधित सदस्यांनी प्रतिष्ठित दुकानदारांना सांगितले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे घ्या. प्रत्यक्ष बोलणे झाल्यानंतर मापे घेऊन प्रतिष्ठित दुकानदार गेले. नंतर आठ ते दहा दिवसांनी त्यांनी गणवेश तयार आहेत परंतु ज्यादा वाढलेल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ग्रामसेवकांची चिट्ठी आणण्यास फोन करून सांगितले.
शाळेतील गुरुजींनी ग्रामपंचायतीला गणवेश पुरवण्याबाबत पत्र ग्रामपंचायत सदस्य यांच्या सूचनेनुसार अगोदरच दिलेले होते. गुरुजींनी पुन्हा सदस्यांना शाळेत बोलावले व सांगितले कि ग्रामसेवकाच्या चिठ्ठीशिवाय वाढलेल्या विद्यार्थ्यांचे गणवेश दुकानदार देण्यास तयार नाहीत. दुकानदारांची व संबंधित सदस्यांचे फोनवर गणवेश देण्याबाबत बोलणे झाले .सदस्यांनी प्रतिष्ठित दुकानदारांना विद्यार्थ्यांचे सर्व गणवेश देण्यासाठी सांगितले. सदस्य शाळेतून गेल्यानंतर काही वेळानंतर संबंधित दुकानदारांनी शाळेतील गुरुजींना पुन्हा फोन केला. या फोन मधील संभाषणात गुरुजींनी त्यांना सांगितले जेवढ्या रकमेचा चेक दिला आहे तेवढे सर्व गणवेश द्या .राहिलेल्या गणवेशाचे नंतर बघू. संबंधित गणवेश आणल्यानंतर प्रतिष्ठित दुकानदारांनी पुन्हा शाळेतील गुरुजींना फोन केला.
पुरंदर मधील महाविकास आघाडीत बिघाडी
तुम्ही सदस्यांना फोन करायला सांगून मध्यस्थी करायला लावली हे चुकीचे आहे. हे योग्य नाही. त्यांना सांगा ज्यादा वाढलेले गणवेश शिल्लक नसल्याकारणाने दिलेले नाहीत. गुरुजी त्यांना हो म्हणाले. परंतु संभाषण वाढत गेले गुरुजींनी दुकानदार ला सांगितले यात आमची चूक काय आहे. माप घ्यायला आला होतात त्याच वेळेला स्पष्ट सांगितले असते तर प्रश्नच उद्भवला नसता .प्रतिष्ठित दुकानदार म्हणाले तुम्हाला पुळका असेल तर तुम्हीच गणवेश द्या. आमचे आपापसातील चांगले असणारे संबंध बिघडवू नका. प्रतिष्ठित दुकानदारांच्या दुहेरी बोलणे गुरुजींच्या लक्षात आले. आश्चर्य वाटले. संबंधित सदस्य व ग्रामपंचायत प्रतिष्ठित दुकानदारांनी दिलेल्या वागणुकीबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. (टिप सदरची कथा काल्पनिक आहे. याच्याशी कोणाचा योगायोग जुळाल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)