सासवड शहरातील रोड रोमीओची संख्या वाढली
सासवड (प्रतिनिधी) सासवड शहरात काही तरुण युवक समाज कंटक गैरवर्तन करुन समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात प्रमुख्याने वाघिरे काॅलेज व सोपाननगर मेन रोड या ठीकाणी काही उपद्रवी तरुण पायी चालणार्या महिला व तरुण माहाविद्यालइन युवतींच्या पाठीमागे येवून बुलेटच्या सालेंसरचा फटाका फोडल्यासारखा आवाज करुन घाबरवतात व नंतर मोठमोठ्याने हसतात.
या प्रकारामुळे युवती व महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परीणामी सामाजिक शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अशा विकृत वृत्तीच्या तरुणांना चांगला वचक बसावा यासाठी सासवड शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा निता उमेश सुभागडे, जिल्हा कमीटी संघटीका कुमुदिनी पांढरे सासवड शहर युवती अध्यक्ष तृप्ती शिंदे यांनी सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व उप निरीक्षक सुप्रिया दुरांदे मॅडम यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
पुरंदर मधील महाविकास आघाडीत बिघाडी
निवेदनात या सर्व प्रकारामुळे सामाजिक शांतता, सुव्यवस्था आणि यांना बाधा निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचे कृत्य करणा-या समाजकंटकांच्या बुलेटचे सायलेंसर काढुन ते बुलडोजरच्या सहायाने सामुहिकरित्या नष्ट करावे जेणेकरून समाजात पसरलेली ही भिती निघुन जाईल आणि आपल्या कार्यवाहीचा बडगा पाहून आपल्या प्रती या समाजकंटकांत भिती निर्माण होईल असे वाटते आसे म्हटले आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेस ला सबस्क्राईब करा
Pingback: गुरुजी तुम्हाला पुळका असेल तर तुम्ही द्या गणवेश – maharashtra express