पुरंदर मधील महाविकास आघाडीत बिघाडी

Share now

Advertisement

सासवड ःः येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये सासवड व जेजुरी नगरपरिषद अशा निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत. तर पुरंदर मधील महा विकास आघाडी मध्ये बिघाडी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असल्याने या निवडणुकांकडे सर्वसमान्य नागरिकांचे लक्ष आहे. 

Advertisement

       राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाविकास आघाडी असून भारतीय जनता पार्टी हा विरोधी पक्ष आहे. तर पुरंदर मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात मात्र सध्या राजकीय खलबते रंगत असताना काँग्रेस मात्र शिवसेनेला कोणत्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याने शिवसेनेने पुरंदर मधील काँग्रेस सोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस असेल त्या ठिकाणी कदापिही आघाडी करणार नाही असे राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

Advertisement

            येणाऱ्या काळात सासवड नगरपरिषद व जेजुरी नगरपरिषदच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये सासवड नगरपालिकेत अनेक वर्ष काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनमत विकास आघाडी सत्ता आहे. यामध्ये मागच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणूक लढवली परंतु शिवसेनेला या निवडणुकीत अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उभे केलेल्या उमेदवार देखील जेमतेम मतावर येऊन पराभवाला सामोरे जावे लागले होते. शिवतारे यांनी त्यावेळी घेतलेल्या पक्ष चिन्हाच्या आग्रहामुळे त्याना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशी चर्चा सध्या सासवड शहरात रंगत आहेत. 

Advertisement

   तर जनमत विकास आघाडीकडून कै. चंदुकाका जगताप व आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेल्या पॅनला बहुमत देत त्याचबरोबर सासवडमधील विकासाची कामे या कडे पहात जनमत विकास आघाडीला सासवडमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत नगरपालिकेची सत्ता जनमत विकास आघाडीच्या ताब्यात दिली होती. 

Advertisement

      तर सासवड मधील असणारी विकास कामे याचा प्रचार करीत जेजुरी नगरपालिका देखील सासवड प्रमाणे होणार हा अजेंडा घेऊन जेजुरी येथील नगरपालिका काँग्रेसने स्वतंत्र लढवली व अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बारभाई व जयदीप बारभाई याच्या ताब्यात असणारी जेजुरी नगरपालिका काँग्रेसने ताब्यात घेतली होती. तर जेजुरी नगरपालिकेत शिवसेनेनी स्वतंत्र पॅनल उभा केला होता मात्र या पॅनला देखील पराभवाला सामोरे जावे लागले. 

Advertisement

        तर लोकमत विकास आघाडी उदयास येण्याची शक्यता……        सासवड व जेजुरी नगरपरिषद त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या मध्ये कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेससोबत न जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याने येणाऱ्या निवडणुकांसाठी समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नवीन निवडणूका लढवल्या जातील असे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. तर या निमित्ताने लोकमत विकास आघाडीची शिवतारे यांच्याकडून घोषणा केली जाऊ शकते व राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांच्यातील यांच्यातील काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निवडणूका लढवल्या जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

         राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांनी आपल्या भूमिका गुलदस्त्यात ठेवले आहेत. वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात युती भविष्यात होऊ शकते. राष्ट्रवादी व भाजपातील तील काही नाराज लोकमत विकास आघाडी ला मदत करू शकतात. अशी देखील चर्चा सुरू आहेत. 

Advertisement

         तर भाजपाचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी कात्रज दूध सांघाला भरलेला उमेदवारी अर्ज हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पुढाकारामुळे अवैद्य ठरवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. असल्यामुळे येणाऱ्या काळात भाजपाचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे हे कोणती भूमिका घेणार याकडे देखील मतदारांचे लक्ष आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *