विजय शिवतारे यांंचा आमदार संजय जगताप यांच्यावर हल्लाबोल ःः संजय जगताप यांच्या वक्तव्याचा विजय शिवतारे यांच्याकडून समाचार :: आगामी काळात कोणाशी होणार युती? काय म्हणाले शिवतारे ते पहा…..

Share now

Advertisement

 सासवड (प्रतिनिधी)  फेब्रुवारी २०२४ पर्यंत विमान उडणार या संजय जगताप यांच्या दाव्याची खिल्ली उडवताना शिवतारे म्हणाले, ते कदाचित कागदी विमान उडवणार असतील. विमानतळात गोंधळ घालून हा प्रकल्प जसा कुजवून टाकला आहे तसाच प्रकार आता गुंजवणीबाबत चालू आहे. योजनेत दुरुस्ती सुचवली असं सांगून आणखी दहा वीस वर्ष वाया घालवायची. गुंजवणीची पाईपलाईन पूर्ण होऊ द्यायची नाही आणि पाणी बारामती फलटणला जाऊ द्यायचे अशी गद्दारी केली जात आहे. दिवे येथे नियोजित असलेला राष्ट्रीय बाजार प्रकल्प सुद्धा आता तालुक्यातून बाहेर गेला अशा शब्दात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आमदार संजय जगताप यांची धुलाई केली. सासवड येथे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   

Advertisement

  अभ्यास नसल्याने आमदारांकडून चुका होत असाव्यात असं मी आजपर्यंत समजायचो. पण अलिकडे अनेक धक्कादायक बाबी माझ्या लक्षात आल्या आहेत. एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे गुंजवणी, विमानतळ, राष्ट्रीय बाजार असे प्रकल्प कुजवून टाकले जात आहेत. हे पाप करणारा गद्दार दुसरा तिसरा कोणी नसून पुरंदरचा आमदार आहे 

Advertisement

सरकारी कामात हस्तक्षेप एकावर गुन्हा दाखल

Advertisement

समविचारी लोकांशी युती शक्य –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत शिवतारे म्हणाले कॉंग्रेस वाईट नाही पण पुरंदरची कॉंग्रेस ही आमदार जगताप कॉंग्रेस आहे. या निवडणुकांमध्ये तालुक्याच्या हितासाठी जे लोक एकत्र येऊ शकतील त्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ असे शिवतारे म्हणाले.    

Advertisement

Advertisement

अजित पवार त्यांच्या तालुक्याचं हित पाहत असतील तर ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. परंतु आपले आमदार मात्र गद्दार आहेत. गुंजवणीचा प्रश्न भोरचा आमदार उपस्थित करतो, विमानतळाचा प्रश्न सातारचा खासदार मांडतो आणि पुरंदरचा आमदार सोसायटीच्या सचिवांचा पगार वाढवा म्हणून विधानसभेत मागणी करतो यावरूनच त्यांची लायकी कळते असा टोलाही शिवतारे यांनी लगावला. 

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.