सरकारी कामात हस्तक्षेप एकावर गुन्हा दाखल
जेजुरी ःः राजेवाडी (ता पुरंदर) येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वसुलीसाठी गेलेल्या शाखा अभियंत्याला आरोपी गणेश नामदेव जगताप (रा. तक्रारवाडी राजेवाडी ता. पुरंदर जि. पुणे) यांनी मारहाण केलेली घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी विकास विनायक जाधव (वय ३८ धंदा नोकरी महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित राजेवाडी शाखा कार्यालय राहणार गुरुळी ता. पुरंदर जि. पुणे) यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 31/3/ 2022 रोजी 03:45 वा ते 04:00 वा पर्यंत तक्रारवाडी राजेवाडी येथील आरोपी च्या घरासमोर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी यातील आरोपी मजकूर यांनी फिर्यादी हे ग्राहकांची वीज बिलांची थकबाकी वसुली करत असताना दुपारी तक्रारवाडी राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावांमधील नामदेव महादेव जगताप यांच्याकडे असणारी वीज बिल थकबाकी वसूल करण्यात घरासमोर आले
असता नामदेव महादेव जगताप यांचे घरातील गणेश नामदेव जगताप यांना तुमची घरगुती वापराचे वीज बिल भरा आपणाला वेळोवेळी सांगितले आहे जर आज आपण बिल भरले नाही तर वीज कनेक्शन तोडण्यात येईल असे बोलत असताना आरोपी नामे गणेश नामदेव जगताप यांनी तुला काय करायचे ते कर असे म्हणून फिर्यादीची गचंडी धरून फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली व सरकारी कामात अडथळा केला म्हणून वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पिंगळे हे करीत आहेत.
Pingback: विजय शिवतारे शेतकऱ्यांचा आमदार संजय जगताप यांच्यावर हल्लाबोल ःः संजय जगताप यांच्या वक्तव्याचा