आहो त्या अधिकाऱ्याला टिचर भेट दिला कि दाखला मिळतो. ःः जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचे वारे
पुणे जिल्हा परिषदेने नुकत्याच शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुगम व दुर्गम असे दोन विभाग केले आहेत. या पैकी दुर्गम विभागा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या प्राधान्य मिळणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक सध्या आपापल्या शाळा कशापद्धतीने दुर्गम भागात बसतील यासाठी प्रयत्न करीत आहेत शासनाने सात प्रश्न विचारून त्यावरील संबंधित अधिकाऱ्यांचे अभिप्राय व दाखले घेतलेले आहेत.
यामध्ये अवघड शाळांच्या क्षेत्रांची माहिती जिल्हा परिषदेने घेतली असता यामध्ये नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये असणारे गाव याची तहसीलदार सासवड यांच्यामार्फत असणारी माहिती, सरासरी पर्जन्यमान दोन हजार पेक्षा जास्त अथवा नैसर्गिक आपत्तीने संपर्क तुटणारे गाव याची माहिती तहसील कार्यालय सासवड यांच्या कडून प्राप्त करून घेऊन, हिस्त्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगल प्रदेश वनविभाग सासवड व तहसील कार्यालय सासवड यांच्यामार्फत असा प्रदेश आहे किंवा नाही माहिती घेणे,
वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव वाहतूक योग्य रस्ते न जोडलेल्या शाळा एसटी बसेस ची सोय आहे किंवा नाही याबाबत सासवड एसटी आगार यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेणे, संवाद छायेचा प्रदेश यांच्या कडील माहिती, डोंगरी भागाबाबत तहसील कार्यालय यांच्याकडे माहिती प्राप्त करून घेणे, राष्ट्रीय राज्य महामार्ग पासून दहा किलोमीटरच्या दूर असणार्या शाळांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून प्राप्त करून घेणे यापैकी तीन निकषाला पात्र असणाऱ्या शाळा यांचे माहिती देण्यात आली आहे.
हे दाखले गोळा करीत असताना एका कार्यालयात गेलो आणि त्या अधिकाऱ्याला टीचर (दारुचा खंबा ) भेट दिला व लगेच अधिकाऱ्याने दाखला देण्याचे कबूल केले. आणि त्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर पंधरा ते वीस लोकांचा एकच एकच हशा पिकला.
अशा पद्धतीने जर दाखले गोळा होत असतील तर शिक्षकांच्या बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाईल का याबाबत प्रश्नचिन्हच आहे. (टिप ःः पुरंदर मधील वाचकांनी या कडे दुर्लक्ष कराव)