समोरून कौतुक, मागून टीका शिक्षणाचे तिनतेरा
नुकतेच तालुक्यातून एक अधिकारी पदोन्नतीने बदलून गेलेले आहेत. या अधिकाऱ्याच्या मनात ते तालुक्यात रुजू झाल्यानंतर जवळीक साधण्याचा प्रयत्न या शिक्षकाने केला. परंतु आपली डाळ शिजत नाही हे पाहून या शिक्षकाने या अधिकारीच्या विरोधातच चुकीचे सांगण्यास व गैरसमज कसे निर्माण होतील असे मुद्दाम केले .
यानंतर या शिक्षकाला या सर्व उद्योगात यश देखील मिळाले. नंतर हा शिक्षक गुपचूप या अधिकाऱ्याला भेटू लागला तालुक्यातील शिक्षक काय करतात, काय बोलतात याची माहित (चाड्या करू लागला) देऊ लागला अधिकाऱ्याला एकाचे दोन करून चुकीचे सांगू लागला. त्यामुळेच या शिक्षकाचे व सबंधित अधिकाऱ्याचे चांगलेच साटेलोटे जमले याची नजर एका संघटनेच्या प्रमुख पदावर असून याने केलेल्या चुकीची शिक्षा एक शिक्षक नेत्याच्या चांगलीच अंगलट आलेली आहे.
हा शिक्षक बदलून गेलेल्या अधिकाऱ्याच्या बदलीच्या ठिकाणी झालेल्या सत्काराचे फोटो माहिती या तालुक्यात का पाठवीत आहे याचे कोडे शिक्षकांना अजून उलगडलेले नाही. पण याचे उद्योग लक्षात आलेले आहेत. याची नितीमत्ता सर्वांनी ओळखली आहे. याने एका पदाधिकारी याची जागा खरेदी केली आसल्याने माझ्या कडे मोठी तकत आहे हे इतर शिक्षकांना दाखवुन त्याना दमबाजीचे डोस सुरु आसतात . शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे सोडुन या शिक्षका कडुन शिक्षणाचे तिन तेरा वाजले आहेत की काय आशि देखील चर्चा आहे. (टिप ःः हि कथा काल्पनिक आहे. याच्याशी कोणाचा हित संबंध जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)