नगरपालिकेच्या अपूर्ण, दर्जाहीन कामांची बिले करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
सासवड (प्रतिनिधी) सासवड नगरपालिकेने दिलेल्या सार्वजनिक कामांची बिले मार्च अखेर काढण्याची गडबड सुरू असून अपूर्ण दर्जाहीन कामांची बिले कडण्यात येऊ नयेत. जो कोणी अधिकारी दर्जाहीन कामांची बिले काढेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते डॉ उदयकुमार जगताप यांनी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांना दिले आहे.
इंदिरा नगर झोपडपट्टी जवळील म्युरालचा फोटो उदाहरणादाखल पाठवीलेले आहेत. या म्युरल च्या कामाच्या निविदा, जाहिरात काम सुरू केल्यानंतर निघाली आहे. नगरपालिकेत काही ठराविक लोकांना ठरऊन कामे दिली जातात . नगरपालिकेच्या अशा संशयित कामाचे थिर्ड पार्टी ऑडिट करावे. कामाचा दर्जा व पूर्णत्वाच्या दाखल्याबाबत बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अधिकारी गावात फिरत नाहीत कामाचा दर्जा तपासात नाहीत. या कामाची बिले काढली असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे नगरपालिकेला दिलेल्या पत्रात जगताप यांनी म्हटले आहे.