त्या मृतदेहाची ओळख पटली
सासवड ःः सासवड शहरातील पापीनाथ हौऊसिंग सोसायटी जवळील एका ओढ्याच्या कडेला अनोळखी मृतदेह सापडल्याची नोंद सासवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती त्यानंतर सासवड पोलिसांनी सदर मयत व्यक्तीची ओळख पटविणे याबाबत सोशल मीडियामध्ये आव्हान केलं होते, या आवाहनास प्रतिसाद मिळाला असून सदर मयताची ओळख पटली असून मयत व्यक्तीचे नाव पवनकुमार दुबे, वय 37 वर्ष मूळ राहणार, प्रयागराज उत्तर प्रदेश हल्ली, राहणार भेकराईनगर, हडपसर असे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
सदर मयत व्यक्ती बाबतीत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत पवन कुमार हा हडपसर गाडीतळ येथील एका सायकल दुकानात कामास होता, गेली पाच वर्षापासून तो त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करत होता मयत पवन कुमार याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले असल्याचं प्राथमिक तपासात समजले असूनपत्नीशी भांडण झाल्यामुळे मयत पवनकुमार हा सतत दारूच व्यसन करत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.
गेली तीन ते चार दिवसांपासून मयत पवन कुमार हा कामावरती आला नव्हता असे तो कामास असलेल्या दुकान मालकाने पोलिस तपासात दिली आहे. एकंदरीत पवन कुमारच्या मृत्यूचा तपासपोलिसांकडून कसून चालू आहे. अशा पद्धतीने सासवड शहरात मयत व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने मात्र दोन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात खळबळ उडाली आहे.