शहरातील मेडिकल चे शटर तोडुन चोरांचा गल्यावर डल्ला
सासवड ःः संत सोपानदेव हॉस्पीटल सासवड येथील बंद मेडीकलचे शटर उचकटून गल्ल्यातील रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास केल्याची घटना घडली असून गणेश सुभाष झेंडे वय 37 वर्ष रा. त्रिशुल हौसिंग सोसायटी, सासवड ता. पुरंदर जि. पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश सुभाष झेंडे यांनी फिर्याद दिली आहे की, ता.22/02/2022 रोजी रात्री 10:30 वा. ते ता.23/02/2022 रोजी सकाळी 9:00वा.चे दरम्यान संत सोपानदेव हॉस्पीटल सासवड यांच्या मालकीचे हॉस्पीटलचे इमारतीत ते चालवत असलेले संत सोपानदेव हॉस्पीटल नावाचे मेडीकलचे शटरचे कुलुप तोडुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने काउंटरचे ड्रावरमधील 10,000/- रू. त्यामध्ये 100/- रू. दराच्या 100 नोटा ,5,000/- रू. त्यामध्ये 50/- रू. दराच्या 100 नोटा , 10,000/- रू. त्यामध्ये 10/- रू. दराच्या 1000 नोटा,5,000/- रू. त्यामध्ये 1,2, 5, 10 रू.दराचे कॉईन असे एकूण 30,000/- रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे.
हॉस्पीटल मधील सी.सी.टिव्हि. फुटेज चेक केल्यानंतर आज रोजी त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. सासवड पोलिस पुढील तपास करीत आहेत.