“शेत दोघांच” या उपक्रमात सातबाराच्या हक्कात महिलांची नावे

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी).२३: पुरंदर तालुक्यातील ६० शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमीनीत पत्नीला सह हिस्सेदार केले असून पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत तसेच मासूम संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ. रमेश अवस्थी यांच्या हस्ते या शेतकरी दांपत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दिपाली कदम, जया नलगे, मीना शेंडकर, काजल जैन मान्यवर म्हणून उपस्थित होते. 

Advertisement

  मासूम संस्थेच्या वतीने लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत ‘ शेत दोघांच ‘ उपक्रमाचा प्रचार व प्रसार करुन शेत जमीनीत पत्नीला सह हिस्सेदार करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. पुरंदर तालुक्यातील तीनशे शेतकऱ्यांनी पत्नीचे नाव सह हिस्सेदार नाव लावण्यासाठी अर्ज दाखल केले आहे. त्यातील १५० लोकांची सुनावणी तहसीलदार कार्यालयात झाली असून ६० महिलांची ७/१२ उताऱ्यावर नोंदणी करण्यात आली आहे

Advertisement

त्या शेतकरी दांपत्याचे मासूम सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना रुपाली सरनोबत यांनी मासूम संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यामुळे पुरंदर मधील ६० महिलांची सह हिस्सेदार म्हणून नोंद करण्यात आली असून या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा मिळाला असल्याचे सांगितले तहसील कार्यालयात  प्रलंबित असलेल्या अर्जांची लवकरच सुनावणी होऊन महिलांची नावे ७/१२ उताऱ्यावर लावण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

Advertisement

डॉ.अवस्थी म्हणाले की शेतातील सत्तर टक्के कामे महिला करत असतात पण शेत जमीन किंवा घरावर महिलांचा हक्क नसतो पुरंदर मधील ६० शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीला सह हिस्सेदार म्हणून शेतजमीनत समान हक्क दिला असून पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेलेला निर्णय हा एक ऐतिहासिक बदल  असल्याचे सांगितले. शेतकरी महिलांना शेती बरोबर,शेती पूरक व्यवसाय, शेतीवर आधारित उद्योग धंदे तसेच कर्ज योजनांचा लाभ घेतला पाहिजे असे सांगून या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन इतर शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीला सह हिस्सेदार म्हणून नोंद करण्याचे आव्हान केले.

Advertisement

      यावेळी शेतकरी महिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ‘शेत दोघांच’ या अभियानाच्या माध्यमातून शेत जमीनीत समान मालकी हक्क मिळाल्याने समाजातील दर्जा व जगण्यासाठी आधार मिळाला असल्याचे सांगून मासूम संस्थेचे व तहसीलदार कार्यालयाचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना महामुनी, प्रस्तावना मीना शेंडकर, आभार सुनंदा खेडेकर यांनी मानले कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोनाली म्हेत्रे, वैशाली कुंभारकर तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.