प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख पुढाऱ्यांचे अतिधाडस ….

Share now

Advertisement

पुरंदर तालुक्यातील शिक्षकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या गावामध्ये जिल्हा परिषद निवडणूकीची तयारी म्हणून एका राजकीय पक्षाने  मेळाव्याचे नुकतेच आयोजन केले होते.
या मेळाव्यासाठी संबंधित पक्षाचे  राजकीय पदाधिकारी, पुढारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement


या उपस्थितांमध्ये काही प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख पुढारी राजरोसपणे उपस्थित राहिले. प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख पुढाऱ्यांना कोणत्याही पक्षाच्या मेळाव्यामध्ये सहभागी होता येत नाही. परंतू संबंधितांनी राजकीय पक्षाच्या मेळाव्यामध्ये उपस्थिती दाखवून नक्की काय साध्य केले ?

Advertisement


  शिक्षक पुढारी व काही केंद्रप्रमुख वर्चस्व दाखवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे धाडस करण्यास मागेपुढे पाहत नाहीत व होणाऱ्या परिणामांची देखील तमा बाळगत नाहीत. अशी यापूर्वी देखील अशाच एका राजकीय व्यासपीठावर गेल्यामुळे संबंधित केंद्रप्रमुख यांची निलंबन प्रकरण घडले होते. तरीही या शिक्षक पुढारी व केंद्रप्रमुख यांनी अद्याप कोणताही बोध घेतलेला दिसत नाही.
संबंधितांना राजकीय पक्षाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासंबंधी  परवानगी कोणी दिली ? या विषयी दबक्या आवाजात चर्चा सूरु आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.