सैनिक अक्षय डोंबाळे यांच्या हस्ते जि.प . शाळा शिवतक्रार येथील ध्वजारोहण
निरा: दि 26 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतक्रार येथील त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी ,शाळेचे ध्वजारोहण भारतीय लष्कर आर्मी सेवेमधील सैनिक अक्षय डोंबाळे यांनी केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत निरा शिवतक्रार चे सदस्य संदीप धायगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम लकडे ,निरा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजी लकडे ,ग्रामपंचायत निरा चे माजी सरपंच चंद्रकांत धायगुडे, माजी सदस्य बापूसाहेब धायगुडे, यांच्यासह अनेक ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संविधान वाचन घेण्यात आले. व तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली . विद्यार्थ्यांना अंगणवाडी सेविका जयश्री पवार , मच्छिंद्र लकडे, अक्षय डोंबाळे यांनी खाऊवाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय हाडंबर यांनी केले , आभार नंदकुमार चव्हाण यांनी मानले.