बोपगाव येथील मानाची काठी व पालखीला प्रवेश नाकारला ःः वाई मांढरदेवीची यात्रात पोलिसांची नाकेबंदी
भोर : महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या मांढरदेवी ता.वाई येथील श्री काळुबाई देवीची यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी बंद असल्याने भाविक भक्तांमध्ये नाराजीचा सूर आसल्याचे चित्र आहे.तर बोपगाव (ता.पुरंदर) येथील देवीच्या मानाच्या काठी-पालखीलाही प्रवेश बंद केल्याने भक्तांना नेरे ता.भोर येथूनच पुन्हा घरी परतावे लागले.
कोरोना संसर्ग मागील दोन वर्षांपासून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डोके वर काढत आहे.या काळात भोर तालुक्यातील गाव देवांच्या यात्रा सुरू होत असतात.त्यातच सुरुवातीला मांढरदेवी गडावरील काळूबाई देवीची यात्रा जानेवारी महिन्यातील पौष पौर्णिमेला भरत असते.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रशासनाने बंदी घातल्याने यात्रा उत्सव बंद आहेत.यामुळे गावोगावच्या यात्रांवर चालणाऱ्या व्यवसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.