पुरंदरची चिंता वाढली करोना बाधीत रुग्ण वाढले सर्वाधिक रुग्ण या शहरात
सासवड ःः पुरंदर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना बांधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पहायला मिळत असून, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल २८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक २० रुग्ण हे एकट्या सासवड शहरातील आहे.
तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे.काल सासवड येथे ५३ रुग्णांचे RTPCR टेस्ट घेण्यात आल्या त्यापैकी २८ रुग्नांच्या टेस्टचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेत, यातील २० रुग्ण हे सासवड शहरातील असून , शिवरी येथील २ रुग्ण असून साकुर्डे, बेलसर, तोडलं, सिंगापूर, मुंजवडी, गराडे येथील प्रत्येकी १ रुग्णाचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेत, जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची व ग्रामीण भागातील पी.एस.सी केंद्रांची आकडेवारी नसल्याने आकडेवारी अधिक वाढण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरंदरच्या नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.