जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पुरंदर तालुका प्रथम स्थानी

Share now

Advertisement

सासवड: स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम वस्ती येथील विद्यार्थिनी ईश्वरी कैलास हिंगणे हिने निंबंध स्पर्धेत पुणे जिल्ह्यात इयत्ता 1 ते 4 गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

Advertisement

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारकरवाडी येथील, विहंग सचिन सातभाई याने, वक्तृत्व स्पर्धेत पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांक, व हर्ष सुहास दुधाळ सामान्यज्ञान स्पर्धेत पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. या यशस्वी विद्यार्थ्यांना अनंता जाधव ,सुरेखा जाधव ,विद्या म्हेत्रे , शांग्रुधर कुंभार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.