राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता तरी एक मेकांचे पाय ओढण्याचे थांबवावे ःः शामकांत भिंंताडे
सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे खेकडे झाले आहेत. सातत्याने पाय ओढण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते करीत असतात. आता तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एका मेकांचे पाय ओढायचे थांबवावे व ज्या व्यक्तींना पक्ष संधी देतो त्याचे प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. पक्षाचे प्रामाणिक पणे डॉ दिगंबर दुर्गाडे यांनी काम केले यामुळे त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली. त्याचबरोबर माझ्या शिक्षण संस्थेला संभाजी झेंडे यांच्या मुळेच मान्यता मिळाली. असे अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शामकांत भिंताडे यांनी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी डॉ दिगंबर दुर्गाडे, मुंबई सेकंडरी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुधाकर जगदाळे त्याचबरोबर राज्य पुरस्कार समितीच्या सदस्यपदी नंदकुमार सागर यांच्या निवडी झाल्यानंतर त्यांच्या सत्काराचे आयोजन अजित नागरी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच तालुक्यात पुरंदर किल्ला, जेजुरीचा खंडेराया, भुलेश्वरचे मंदिर, त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म स्थळ, मल्हारगड किल्ला, अशा अनेक ऐतिहासिक व धार्मिक त्याचबरोबर राष्ट्रपुरुष या तालुक्यात होते याचा अभिमान आपल्याला आहे. त्यामुळे पुरंदर ला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पुरंदरचे नावे यामुळे उज्वल झाले आहे. असे डॉ दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
डॉ दिगंबर दुर्गाडे यांनी सातत्याने जमिनीवर राहून काम केले मागील संचालक पदाच्या कार्य काळामध्ये अनेक प्रश्नांना सरांनी न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला त्यामुळे मतदारांनी मोठ्या मताधिक्यानी विजयी केले असल्याचे नंदकुमार सागर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शामकांत भिंताडे, बाळासाहेब भिंताडे, भानूकाका जगताप, राहुल गायकवाड, दिलीप जगताप, ईश्वर बागमार, कला फरतडे, बापू बडदे, प्रकाश फरतडे, संदेश पवार, अरुण जगताप, आबा क्षिरसागर, माऊली घारे, सदाशिव लांडगे, नंदकुमार सागर, सुधाकर जगदाळे, अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक याकूब सय्यद, मिलिंद जाधव, केशव काकडे, रामदास शेलार, महेश दळवी, वामण कामठे, बंडुकाका जगताप, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मावली घारे यांनी केले.