भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे ग्रामीण यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान
पुरंदर (प्रतिनिधी अक्षय कोलते) पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघातील पत्रकारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वतोपरी मदत केले जाईल असे भाजपाचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी सांगितले.
तालुक्यातील पत्रकारांचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले जाते. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेच्या पवित्र कार्याची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांनी केली.६ जानेवारी १८३२ या दिवशी बाळशास्त्री जांबेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले. त्यांचे स्मरण म्हणून हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. असे भारतीय जनता पार्टीचे युवा सरचिटणीस श्रीकांत ताम्हणे यांनी सांगितले
समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना समाजासमोर मांडण्याचे काम पत्रकार करत असतात.कोरोनासारख्या महामारीतही स्वतःच्या जीवाची काळजी न करता पत्रकार काम करत होते.मात्र तरीही त्यांची कोणी दखल घेत नाही. पुरंदर तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, जालिंदर जगताप तसेच पत्रकार भरत निगडे, राहुल शिंदे, विनायक गुरव, राजेंद्र बर्गे, निखिल जगताप, समीर भुजबळ विशाल फरतडे निलेश भुजबळ अमृत भांडवलकर स्वप्निल कांबळे, अक्षय कोलते, मुनीर शेख, सुनिता कसबे, हनुमंत वाबळे, छाया नांदगुडे महाविर भुजबळ विजय खळदकर रामदास लाघी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले व आभार सचिव अमोल बनकर यांनी मानले.