पुरंदर मधील शिक्षक नेत्याची एकल शिक्षक संघटनेच्या राज्य नेत्याला सोशल मिडिया वरुन धमकी…. असेल तेथून उचलून आणून कार्यक्रम करु

Share now

Advertisement

सासवड  – नुकतीच पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक अतिशय अटीतटीची व तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये झाली. दि. ३१ डिसेंबर रोजी पुरंदर शिक्षक पतसंस्थेत महिला सभापतीची निवड झाली. परंतु हे यश डोक्यात गेल्याने त्यांच्या शिक्षक पॅनल मधील एका व्यक्तीने महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या प्रमुखालाच सोशल मिडिया वरुन धमकी दिली आसल्याची घटना घडली आहे. 

Advertisement


       शिक्षकी पेशाला काळीमा फासेल अशा अशोभनीय व निंदनीय शब्दांत जाहीर शिक्षकांच्या “केंद्र राजेवाडी” ग्रुपवरच सर्वांसमक्ष लेखी धमकी दिल्याने पुरंदर तालुक्यात अशा धमकी देणारांचे खरे  रंग पाहावयास मिळाल्याची चर्चा आहे. 

Advertisement


काय म्हणाले संबंधित महाशय..?.  ते वाचा त्यांच्याच शब्दात……                     आता महिलेला सभापती पद मिळाले. निवडणूक असल्याने निवड होईपर्यंत ताण असतो. निवड होईपर्यत शांत निवड होऊ दयायची असे ठरले होते.  त्या वेळी ज्यांना शक्य झाले, वेळ मिळाला ते आले. आणि थोडा आनंदाच्या क्षणी आनंद साजरा झाला. आणि हा आमची लाज काढतोय.

Advertisement

        *मी जाहीर सांगतोय की परत असा शहाण पणा करून आमची लाज काढली तर सोडणार नाही.**असेल तेथून उचलून कार्यक्रम करू.* शांत राहतो म्हणजे मी भित्रा आहे असे समजू नये. माझी दुसरी बाजू दाखवली  *तर पळता भुई थोडी होईल.* मी शांत आहे, शांत राहू द्या.* 

Advertisement

        *मी चांगलं वागतो, बोलतो पण वाईट वागण्याची, करण्याची वेळ येऊ देऊ नको. तू किती……….चा हे सगळ्यांना माहित आहे. तू तुझ्या हिशोबात रहा.हिंमत असेल तर समोरासमोर ये.
वरील प्रमाणे शिक्षक ग्रुप वर धमकी दिल्याने मदत करणाऱ्या समर्थकांना आश्चर्य वाटले., त्यामुळे चुकीच्या व्यक्तीच सत्तेवर आल्याची खात्रीच झाली. उपकाराची भाषा अपकाराने करणारा कृतज्ञ व्यक्ती असल्याच्या समर्थकांच्या भावना पाहावयास मिळत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.