पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या पॅनल प्रमुखां कडून जमावबंदी कायद्याचे उल्लंघन कारवाई ची माघणी. विरोधकाच्या दारात फटाके फोडून हुल्लड बाजीत ९५ वर्षांच्या वृध्द आजींना त्रास.
सासवड ःः पुणे जिल्ह्यात कोरोना व ओमिक्रॉन निर्बंधा बाबत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जमावबंदी व संचारबंदीचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक ग्रामीण यांचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्बंधांवर खबरदारीचे आवाहन देखील केलेले आहे.
नुकतीच पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक पार पडली या निवडणुकीच्या निकाला नंतर ३१ डिसेंबर रोजी पतसंस्थेच्या सभापती, उपसभापती व मानद सचिव पदाची निवड झाली. या निवडीनंतर रात्री परिवर्तन पॅनेलच्या प्रमुखांनी हा आदेश धुडकावून विष्णुप्रिया शिक्षक सोसायटीमध्ये जमाबंदी मोडीत काढत ५० ते ६० शिक्षक एकत्रित येत बेकायदेशीर गर्दी केली.

स्वाभिमानी शिक्षक समितीचे प्रमुख तानाजी फडतरे व त्यांच्या समर्थकांनी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित सभापती व संचालकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन व फटाक्यांची आतषबाजी केली.
ध्वनिक्षेपक(लाऊड स्पिकर)वर मोठ्या आवाजात गाणी /संगीत लावले. काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. जाहिर भाषणे करत विरोधकांचेवर अशोभनीय व निंदणीय टीकाटिप्पणी केली. कर्णकर्कश आवाजामुळे सोसायटीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे अबालवृद्धांना व आजारी व्यक्तींना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. विरोधी महा-विकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांचे वाभाडे काढत दमबाजी केली आसल्याची चर्चा परीसरात होती.
त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच भारतीय दंडसंहितेचे कलम १८८ नुसार मार्गदर्शक सुचनां नुसार जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले.याबाबत संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे प्रमुख आयोजकांवर गुन्हे दाखल होवून कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे विष्णुप्रिया सोसायटीतील गृहिणी रुपाली संदीप कदम यांनी पोलीस निरीक्षक सासवड यांच्याकडे केली आहे.
तर या संदर्भात आमदार संजय जगताप, उपविभागीय अधिकारी भोर, तहसिलदार पुरंदर, मुख्याधिकारी सासवड, अध्यक्षा भूमाता ब्रिगेड पुरंदर यांच्याकडे निवेदने देण्यात केली आहे.
कोट- समाजात शांतता राखण्याची जबाबदारी असणाऱ्या समाजाला दिशा व मार्गदर्शन करणाऱ्या आदर्श गुरुजनांकडूनच अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली होत असेल तर सर्वसामान्यांनी यांचा काय आदर्श घ्यावा ?
कोटःःः….आमच्या कुटुंबात ९५ वर्षाच्या आजी असून त्या आजारी आहेत. त्यांना औषोधोपचार, तपासणी, सलाईन लावणे देखील आमचे फॅमिली डॉक्टर घरी येवून करतात. हे फटाके वाजवणारांना माहिती असून देखील त्यांनी आनंदोत्सव़ आमच्याच दारात का केला? येथे माणुसकी देखील हरली. त्यामुळे या घटनेचा निषेध करावा वाटतो. अशा प्रकरच्या संतप्त जनक भावना रुपाली कदम यांनी व्यक्त केल्या.