निरा व राख केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

निरा ; 1 जानेवारी 2022 रोजी निरा येथेल महात्मा गांधी विद्यालयात निरा, राख केंद्राची शिक्षण परिषद केंद्रप्रमुख सुरेश लांघी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आली होती.
Advertisement
याप्रसंगी तज्ञ मार्गदर्शक म्हणून राख शाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल गायकवाड व निरा शाळेतील प्राथमिक शिक्षक मनोज दीक्षित यांनी मार्गदर्शन केले.
Advertisement
या शिक्षण परिषदेमध्ये दिक्षा ॲप नोंदणी बद्दलचे मार्गदर्शन सर्व शिक्षकांना करण्यात आले. सर्व शिक्षकांची दिक्षा ॲप मध्ये नोंदणी करण्यात आली तसेच जानेवारी 2022 मध्ये करण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चिती बद्दलचे मार्गदर्शन करण्यात आले .शिक्षण परिषद बारा ते चार या वेळेत आयोजित करण्यात आली. या परिषदेसाठी 125 शिक्षक उपस्थित होते
Advertisement
Advertisement