शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधेचा लाभ देणार ःः कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या मेळाव्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

Share now

Advertisement

आळंदी ःः महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची शिक्षण परिषद , शिक्षक मेळावा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा न्यू इंद्रायणी मंगल कार्यालय आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथे पार पडला .यावेळी शिक्षक मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली . आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की , कोरोनाच्या कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले‌‌ल्या शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ५० लाख शासकीय विमा त्वरीत मंजूरी करणे तसेच कुटूंबातील एकाला अनुकंपातत्वावर शासकीय नोकरी मिळावी .शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना गृहविभागा प्रमाणे cashless आरोग्यसेवेचा लाभ मिळावा .

Advertisement


शिक्षकांची रूपये १० लाखापर्यंतची वैद्यकीय बिले मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषद प्रशासनाला देणे तसेच विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास लवकर सुरूवात करणे या बाबीं मंत्रिमंडळासमोर मांडून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्यात बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले .

Advertisement

दिनांक २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मेळावा ,शिक्षण परिषद व राज्यस्तरीय कोरोना योध्दा समता पुरास्कार वितरण कार्यक्रम आळंदी,पुणे येथे दोन सत्रामध्ये पार पडला. पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती व करावयाच्या उपाययोजना यावर महाराष्ट्र राज्य क्रास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य सल्लागार दिगंबर काळे यांचे अध्यक्षतेखाली प्रथम सत्र संपन्न झाले .

Advertisement

या वेळी प्रसिद्ध व्याख्याते मतिन भोसले ,भीमा पाटस कारखान्याचे संचालक विकास शेलार ,दौंड पंचायत समितीचे उपसभापती विकास कदम यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या माध्यमातून चाललेल्या कार्याला शुभेच्छा दिल्या .रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पर्वती विधानसभा अध्यक्ष उद्धव चिलवंत यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या कार्यात रि. पा .इ सदैव सोबत असल्याचे सांगितले व कार्यास शुभेच्छा दिल्या

Advertisement

.द्वीतीय सत्रामध्ये शिक्षक मेळाव्याची सुरुवात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर सौ.हिरा(नानी) घुले,दौंड पंचायत समितीचे उपसभापती विकास कदम,आळंदी नगरपालिका प्रशासन अधिकारी सुजाता देशमाने , भिमा पाटस कारखान्याचे संचालक विकास शेलार ,मतीन भोसले, दिगंबर काळे, राज्याध्यक्ष गौतम कांबळे, राज्य उपाध्यक्ष विनोद चव्हाण, महासचिव विठ्ठल सावंत,कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे, कोषाध्यक्ष दादासाहेब डाळींबे,आनंदराव भिसे , श्रीकृष्ण काळेल , शंकर लोणकर , विठोबा गाडेकर अशोक कोलावळे दत्तात्रेय शिनगारे केंद्रप्रमुख गौतममामा कांबळे आदिंच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व महामानवांच्या प्रतिमा पूजनाने झाली .

Advertisement

राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी व्हिडिओ काॅन्फरसनद्वारा सहभाग घेतला . शिक्षकांनी कोवीड १९ काळात केलेल्या कार्याबद्दल प्रशंसा केली .महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व अडीअडचणीत मदत करण्याचे आश्वासन दिले .आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना” महाकोरोना योध्दा समता पुरस्कार ” राज्यातील शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत क्रास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने प्रदान करण्यात आला .

Advertisement

सत्काराला उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की,”मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षण मंत्री,ग्रामविकास मंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन लवकरात लवकर आपल्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करून निर्णय घेण्याचे अभिवचन संघटनेस देतो “. मुख्यकार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्ह्यात रखडलेल्या सर्व शिक्षक संवर्गातील पदोन्नती , मुख्याध्यापक पदोन्नती देखील तातडीने करणार असल्याचे जाहीर केले .

Advertisement

तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांचे गावी मुलींसाठी निवासी शासकीय शाळा लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले . सर्व शासकीय शाळांना काही कंपनी उद्योजकांना देणगी देता यावी यासाठी आयकर विभागाकडे पाठपुरावा सुरू असून यापुढे अशा देणगी रक्कम देणा-यास आयकर सवलत मिळेल अशी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले .राज्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया देखील मार्च अगोदर निश्चितच सुरु होणार असून शासनाने बदली प्रक्रियेसाठी अत्याधुनिक व विश्वसनीय सॉफ्टवेअर घेतल्याची माहिती त्यांनी दिली .

Advertisement

कोरोना काळात गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळाले नाही . त्यामूळे सर्व शिक्षकांनी या मुलांच्या शिक्षणाकडे अधिक वेळ देऊन शिक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान केले . तसेच मतादायित्व प्रमाणपत्र किती महत्त्वाचे आहे व ते शिक्षकांनी अभ्यासपूर्ण भरण्याचे आवाहन केले . संघटनेने समता कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . आपण ज्या पदावर कार्य करता त्या पदाची पुर्ण जबाबदारी व शासकीय कर्तव्य यांचा अभ्यास करून शिका,संघटित व्हा व संघर्ष करा असा मंत्र दिला

Advertisement

.उपमहापौर हिराबाई (नानी)घुले ,दौंड पंचायत समितीचे उपसभापती विकास कदम, संचालक विकास शेलार,आळंदी न.पा.शिक्षण प्रमुख सौ.सुजाता देशामाने, उद्योजक सुधीर मुंगसे,आदि मान्यवरांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या .

Advertisement

१जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे . अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोरोना संक्रमणाची काळजी घ्यावी असे आव्हानही मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी केले . शिक्षण मेळाव्याच्या कार्यक्रमात कोरोना संक्रमणाची सर्व काळजी घेऊन तसेच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून राज्यभरातून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य, जिल्हा, तालुका कार्यकारिणी सदस्य, शिक्षक बंधू भगिनीं तसेच जुनी पेन्शन संघर्ष समितीचे अनेक शिक्षकांनी उपस्थिती दाखवून जुनी पेन्शन तत्काळ मंजूर करणेची मागणी मंत्री महोदयांपुढे मांडली .

Advertisement

राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे ध्येय धोरणे,विद्यार्थी ,पालक व शिक्षक यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ सदैव कार्यतत्पर राहणार असल्याचे मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत व समारोप महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याचे जेष्ठ उपाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी केले . सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपाध्यक्ष विशाल शिंदे यांनी केले .

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *