लग्नाचा टिळा लावण्या पूर्वीच पुण्यात तरुणाचा खून.

Share now

Advertisement

पुणे (प्रतिनिधी) तरूणाचा भररस्त्यावर खून झाल्याने कोथरुड येथे खळबळ उडाली आहे. भरदिवसा या खुनाचा थरार घडला असून, खून पाहणाऱ्यांच्या देखील अंगाचा थरकाप उडाला होता. उच्चभ्रू परिसरात लग्नाचा टिळा लावण्यासाठी निघालेल्या अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरूणाचा भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Advertisement


 मिळालेल्या माहितीनुसार, अनिल जाधव याचा विवाह ठरला होता. त्याच्या टिळ्याचा कार्यक्रम रात्री होता. त्याची घाई गडबड सुरू होती. त्याची एक बहिण डहाणूकर कॉलनीतील लक्ष्णीनगर येथे राहत होती. तर, दुसरी बहिण कर्वेनगर येथे राहण्यास होती.  एका बहिणीला सोडण्यासाठी तो लक्ष्मीनगर येथे आला होता. बहिणीला सोडून तो दुचाकीने पोतनीस परिसरातून केफिप्टी रस्त्याने जात होता.

Advertisement


त्याचवेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. तलवारीने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. भररस्त्यात त्याच्यावर हा हल्ला झाला. रक्तस्त्राव झाल्याने अनिल याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर पसार होताच नागरिकांनीही माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर अलंकार पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *