ऊसाची ट्राॅली पलटी होवून झालेल्या अपघातात मोटार सायकलचा चक्काचूर

Share now

Advertisement

निरा ःः पाडेगाव (ता. फलटण) येथील ऊसतोड टोळीतील ट्रॅक्टर क्रमांक एम.एच १२ डिए ३३७० ला जोडलेल्या एम.एच ४२ झेड १७७३ या ट्राॅली मधून चालक ओंकार दत्तात्रय अडसुळ हा पाडेगाव शिवेचा मळा येथील शेतकरी नंदकुमार मोहिते यांचा तोडलेला ऊस घेऊन जात असताना रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाडेगाव गावठाण जवळीक प्रशांत पिंगळे आणि राजेंद्र खरात यांच्या शेड जवळ आला असता अचानक ट्राॅलीचे चाक तुटून झालेल्या अपघातात शेडजवळ उभी असलेली राजेंद्र खरात यांच्या स्प्लेंडर गाडीवर ट्राॅलीत भरलेला सुमारे दहा टन ऊस कोसळून झालेल्या अपघातात स्प्लेंडर गाडीचा चक्काचूर झाला तर शेडच्या गेटचेही नुकसान झाले आहे. 

Advertisement

या अपघातात ट्रॅक्टर ट्राॅलीचेही मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघात हा ट्राॅलीत क्षमतेपेक्षा अधिक वजन भरल्यामुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून आर्थिक हानी मात्र प्रचंड प्रमाणात झाली आहे

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.