“पुरंदरचे कोहिनूर” गणेश लोणकर.

Share now

Advertisement

शिक्षणाची दारे सर्वांसाठी हळू हळू खुली होऊ लागली.आणि सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांची मुले ही शिकू लागली.केवळ शेती हेच ज्यांचे उदर निर्वाहाचे साधन आहे अशी शेतकरी कुटुंबे आजही आपणांस जीवन मरणाचा संघर्ष करताना दिसतात.पण अशा काही कुटुंबातून काही तरुण मुले मिळेल त्या संधीचे सोने करीत प्रामाणिक पणे उभी राहिली.त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या परिवाराला आर्थिक सामाजिक स्तरावर स्थैर्य देण्याचे काम केले. अशाच एका आपल्या पुरंदरच्या यशस्वी तरुण
व्यक्तीमत्वाचा आपण परिचय करून घेणार आहोत. अर्थातच हे नाव आहे भिवरी गावचे सुपुत्र, पुरंदर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आदर्श शिक्षक मा.गणेश लोणकर..

Advertisement

गणेश लोणकर यांचे शिक्षण एम. ए. (डी. एड.) झाले आणि त्यांना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम शिक्षक म्हणून करण्याची संधी मिळाली…

Advertisement

शिक्षक म्हटले की बरेच जण एका चाकोरी बद्ध जीवन शैलीचा अंगीकार करतात.पण गणेश लोणकर यांनी या चाकोरीत जगण्याचा विचारच केला नव्हता.ते शिक्षक नसते झाले तरी ते ज्या क्षेत्रात जातील तेथे यशस्वीच झाले असते यात दुमत नव्हते…

Advertisement

एक चांगला शिक्षक सर्वार्थाने एक नवी पिढी घडवण्याचे काम करत असतो.त्यात प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी तर नक्कीच मोठी असते..

Advertisement

हा सेवेचा धर्म ही श्री.गणेश लोणकर यांनी अतिशय प्रामाणिकपणे निभावलेला आपणांस दिसतो.आज ही अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती आहे..

Advertisement

नव्या जगाची सर्वच गणिते बदलत होती.शेतकऱ्यांच्या लेकरांना नव्या संधी चालून येत होत्या नुसते डी. एड. होऊन मास्तर होण्याचे दिवस संपले होते.फक्त या संधी हेरता आल्या पाहिजेत आणि त्या साठी शेतकऱ्यांच्या लेकरांना हवे होते ते योग्य वेळी मार्गदर्शन…

Advertisement

आणि हेच फार मोठे काम श्री.गणेश लोणकर यांनी उभे केलेले आपणांस दिसते.त्या साठी त्यांनी पुरंदर सोशल फाउंडेशन ही संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला..

Advertisement

हा त्यांचा ध्यास समाज सेवेचा आणि अभिनव राष्ट्र निर्माणाचा देखील होता..

Advertisement

याच प्रेरणेतून पुरंदर तालुक्यातील समविचारी मित्रांना सोबत घेऊन त्यांनी सासवडमध्ये सुसज्ज असे स्पर्धा परीक्षा व उद्योग मार्गदर्शन केंद्र उभे केले आहे. त्याचा लाभ पुरंदर मधील सर्व स्तरातील परिवाराला होत आहे. यातून अनेक तरुण उभे राहत आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात जात आहेत…

Advertisement

त्यासाठी अगोदर स्वतः देखील आर्थिक दृष्ट्या स्थिर होणे गरजेचे होते.रिकाम्या पोटी समाज सेवा होऊच शकत नाही.दुसऱ्याला मदत करण्यासाठी अगोदर आपण देखील सक्षमच राहिले पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः देखील आपल्या परिवाराला बरोबर घेऊन हॉटेल व इतर उद्योग क्षेत्रात देखील काम करायला सुरुवात केली. त्यांचे सख्खे बंधू पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, शिक्षकनेते सुनील लोणकर, उद्योजक संदीप लोणकर, अँड. सुभाष लोणकर यांनी मिळून हॉटेल लोणकरवाडा समूह स्थापन करून उद्योजक विश्वात दमदार पाऊल टाकले. हे चारही बंधू एक दिलाने कार्यरत राहून विविध क्षेत्रात ठसा उमटवीत आहेत. लोणकर बंधूंच्या बंधूप्रेमाचा, कष्टपूर्ण यशस्वी जीवनाचा आदर्श प्रेरणादायी आहे.

Advertisement

आपले दिवस पालटले की आपल्याच गरीब बांधवांकडे पाठ फिरवणारी ,त्यांना मदतीचा हातभार देण्याचा विचार न करणारी अनेक कोत्या मनोवृत्तीची माणसं आपण आपल्या आसपास पाहत असतो. पण श्री.गणेश लोणकर याला अपवाद आहेत हे त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावरच लक्षात येते..

Advertisement

राजकारण विरहित समाज हिताचे काम करणाऱ्या पुरंदरच्या निवडक तरुणांच्या यादीतील श्री गणेश लोणकर हे अग्रणी नाव आहे..

Advertisement

पुरंदर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक गरजू बांधवाना फार मोठया मनाने मदत करीत आहेत.या कामांची यादी खूप मोठी आहे.नुकतेच एका परिवाराचे घर वणव्यात जाळले होते त्यांना माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे केलेली मदत त्यांच्या संवेदनशील मनाचे ही आपणांस दर्शन घडवते. वृक्षारोपनाच्या माध्यमातून आपला पुरंदर हिरवागार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे..

Advertisement

श्री.गणेश लोणकर हे प्रतिभा संपन्न शिक्षक,एक चांगला मित्र,एक चांगला माणूस, एक चांगला समाजसेवक असे अगदी सत्याने मानणारा त्यांचा जीवाला जीव देणारा परिवार ही मोठा आहे..

Advertisement

एक चांगला माणूस घडण्याची प्रक्रिया आपल्या परिवारापासून सुरू होत असते.या कसोटीवर श्री.गणेश लोणकर बावनकसी सोन्या सारखे उतरले आहेत..

Advertisement

कामाची ऊर्जा घेऊन सतत हसत मुख असणारे हे व्यक्तिमत्व आज पुरंदरच्या अनेक तरुणांसाठी आदर्श म्हणून पुढे येत आहे…समाजकारण म्हणजे समाजकारण नो राजकारण या कठीण मार्गावर आपल्या कार्याची पताका घेऊन हा पुरंदरचा ध्येय वेडा पुढे निघाला आहे.

Advertisement

त्यांना आजचे माझे पुरंदरचे कोहिनूर हे सदर समर्पित करताना मलाही मनस्वी आनंद होत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस मना पासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपली रजा घेतो..

Advertisement

कवी – राजेंद्र सोनवणे.
९८८१६११३७८

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *