ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगानी वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा ःः दत्ता झुरंगे

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) सासवड (ता पुरंदर) येथे होणाऱ्या व यशस्वी योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी त्याचबरोबर दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आवश्यक असणारी कागदपत्रे ही आपल्या ग्रामसेवक यांच्या कडे जमा करावीत व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी केले. 

Advertisement

     पुरंदर पंचायत समितीच्या संभाजी सभागृहामध्ये वयोश्री योजनेअंतर्गत आसलेल्या लाभार्थींचा आढावा ग्रामसेवक यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी झुरंगे बोलत होते. ते पुढे म्हणाले, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ६ हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. आधीची नोंदणी होणे गरजेचे असल्याचे मत दत्त झुरंगे ग्रामसेवक व सरपंच यांनी आपापल्या गावातील लाभार्थ्यांची यादी व असणारी कागदपत्रे तात्काळ जमा केली तर ऑनलाईन नोंदणी करता येईल.   

Advertisement

     यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी अमर माने, सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लहामटे, समाज कल्याण अधिकारी आजित नवसे, परिचेच्या सरपंच ऋतुजा जाधव, त्याच बरोबर सर्व ग्रामसेवक ग्रामसेवक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.