श्री क्षेत्र नारायणपूर येथे आज पासून दत्तजयंती सोहळा
सासवड (प्रतिनिधी) ः श्री क्षेत्र नारायणपूर ( ता. पुरंदर ) येथे १६ ते १८ डिसेंबर या काळात नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंती सोहळा संपन्न होत आहे.
१६ डिसेंबर रोजी सकाळी पुरंदर तालुक्यातुन हिवरे या गावातुन नारायण महाराज यांच्या आजोळातुन आजोळ ज्योतीचे प्रस्थान होऊन दुपारी ही ज्योत नारायणपुर पोहोचेल. सायंकाळी २०० कोटी शिवदत्त नाम यज्ञ अखंड प्रज्वलित अग्नी यज्ञकुंड याठिकाणचा एकविसावा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. येथे यज्ञकुंडाची विधीवत पुजा करुन उपस्थित भाविकांनकडून दिपपुजन होते.
१७ डिसेंबर रोजी दत्त जन्म सोहळ्याचा दुसरा दिवस असून राज्यातील विविध भागातुन येणाऱ्या दिंड्याचे दुपारी स्वागत करुन त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दत्त सेवेकरी मंडळ यांच्या वतीने त्यांचे स्वागत केले जाईल.
सायंकाळी ७ वाजून ०३ मिनिटांनी दत्त जन्म सोहळा सुरू होईल. यात दत्त जन्मावर आख्यान, नाव ठेवणे, पाळणा, सुंटवडा वाटप व पुष्पवृष्टी केली जाईल. यासोळ्यासाठी महाराष्ट्रा बरोबर कोलकता, मध्यप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजराथ, केरळ आदी भागातुन भाविक दत्त जयंती सोहळ्यास येत असतात
. १८ डिसेंबर रोजी सकाळी पालखीची मंदिर प्रदक्षिणा या सोहळा पाहण्यासारखा असतो. यात्रेत हत्ती, घोडे, बँड पथक, ढोल, लेझीम पथकाची प्रात्यक्षिके होत. देवांना चंद्रभाग स्नान होऊन प्रवचन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल अशी मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षिरसागर यांनी दिली.