पुरंदरच्या डोंगराळ भागात आदर्शवत झालेली माळवाडीची शाळा

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधि) सध्या सर्वत्र करोना संसर्ग सुरु असून सर्व शाळा,महाविद्यालये बंद आहेत याही परिस्थितीत ऑन लाईन शिक्षण देत असताना शाळेचा परिसर, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची बौधिक गुणवत्ता या बाबत पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराळ भागांतील मांढर गावच्या माळवाडीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक आदर्श नमुना म्हणून विशेष नावारूपाला येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रजनी पापळ, सह शिक्षक भारत वाघोले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या विशेष सहभागातून या शाळेचे रूप पालटले आहे.

Advertisement

   इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत आणि २९ पट संख्या असणाऱ्या या शाळेत शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. इंग्रजी वाचन उपक्रम , “एबीएल’ संकल्पना, दफ्तरविना शनिवांर, सुंदर हस्ताक्षर, पाढे पाठांतर स्पर्धा, सुंदर व हरित आणि स्वच्छ शालेय परिसर, आकर्षक रंगसंगतीत रंगलेल्या बोलक्या भिंती, स्वच्छ्तागृह, खेळाची साधने, स्वागत कमान , पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर या आणि या सारख्या अनेक सुविधा व उपक्रम हि या शाळेची ओळख आहे. शैक्षणिक शुल्क, अन्य फी भरण्यासाठी पालकांकडे नेहमी नेहमीच पैसे मागण्याऐवजी या शाळेने “पालक फंड” हा अनोखा आणि जिल्ह्यातील बहुधा एकमेव असा उपक्रम राबवला असून त्याद्वारे निधीची तरतूद व वापर केला जात. असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पापळ व वाघोले यांनी दिली. शाळेच्या मागील बाजूस वृक्षारोपण करून हा भाग सदाहरित करण्याचा तसेच उपलब्ध जागेत गांडूळ खत प्रकल्प राबविण्याचा संकल्प शिक्षकांनी व्यक्त केला असून कार्यवाही सुरू केली आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु असले तरी शंभर टक्के मुलांची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगत दोन वर्ग खोल्यात आम्हीं करोनाचे सर्व नियम पाळून चारही इयत्ताच्या मुलांना दोन दोन तासऑफलाईन शिकवणार असून तसा गावकऱ्यांचा ठराव व संमती घेऊन वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचे देखील या शिक्षक द्वयींनी सांगीतले आहे. एकूणच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ही सगळीच मंडळी सतत कार्यरत आहेत. 

Advertisement

   शाळेच्या या विकास प्रक्रियेत सरपंच वंदना पापळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पापळ, सुनील चव्हाण संतोष शिर्के, विजय पापळ, दिपक पापळ, सचिन शिंदे, कैलास पापळ, विकास पापळ, शामराव पापळ, दत्तात्रय पांडुरंग पापळ, केंद्र प्रमुख राजेंद्र कुंजीर, विस्तार अधिकारी वर्षा कुंजीर यांसह सर्व पालक, ग्रामस्थ यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जात आहे. काहीशा दुर्गम भागात पण निसर्गाच्या सान्निध्यात असणारी ही शाळा विकासाच्या एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे हे मात्र नक्कीच आभिमानास्पद आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *