आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त पुरंदर तालुक्यात उत्कृष्ट स्वयंसेवकांचा सन्मान
पुरंदर (प्रतिनिधी अक्षय कोलते)मॅजिक बस इंडिया फाउंडेशन आणि नेहरू युवा केंद्र पुणे, यांच्या वतीने “आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन” निमित्त स्वयंसेवक विशेष कार्यगौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 37 गावातील 20 युवा स्वयंसेवकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे हा कार्येक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली वाघोले, TMO मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांनी मॅजिक बस आणि नेहरू युवा केंद्राच्या कार्याविषयी तसेच या कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
मॅजिक बस ही संस्था पुरंदर तालुक्यात गेली 6 वर्ष काम करत आहे.खेळाच्या माध्यमातून शालेय मुलांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी काम केले जाते. श्री स्वप्नील शिंदे नेहरू युवा केंद्र पुणे यांनी संविधानाची ओळख करून दिली व नेहरू युवा केंद्र पुणे बद्दल माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र बरकडे (वाघर चित्रपटाचे निर्माते, युवा उद्योजक) यांनी स्वयंसेवा या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी 37 युवा गटातील 70 युवा स्वयंसेवक उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे किशोरी ताकवले, पंचायत समितीचे श्री.बंडलकर सर, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे आदी मानवर उपस्थित होते.
त्याचबरोबर मॅजिक इंडिया फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी प्रवीण थोरात व ऋषिकेश बोराडे, युथ मेन्टोर ललित कदम, हर्षदा कुंभारकर- शिळीमकर, सूरज कुंभार, अमित ताम्हाणे, अंकिता जगताप, मिलन उरसळ, स्वाती रनवरे, सारिका करवंदे, कादंबरी कामठे , एकता हिंदुराव,सिद्धार्थ शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद भालेराव यांनी तर आभार शुभम चिकण यांनी मानले.