शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचे वातावरण तापु लागले…. “त्या” पाळण्याची सोशल मिडिया वर सर्वत्र चर्चा…
ःः शिक्षक सहकारी पतसंस्थेचे निवडणूक लागली असून या निवडणुकीमध्ये शिक्षक नेते हे प्रचारात व्यस्त आहेत त्यातच संचालकांच्या वर नुकताच एक पाळणा तयार करण्यात आला आहे. या पाळण्याच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत.
सध्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक नेते एकमेकांवर आरोपांच्या फायरी झाडत आहेत. यातच हा पाळणा सर्वत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.
संस्थेचा पाळणा ……..?……
वाजवून खोट्या ऑडिओ क्लिप साड्या देऊन लग्नाची भेट. संघटनेमध्ये पाडून फूट संस्थेत एंट्री केली हो फीट जो बाळा जो जो रे जो ||१|| 🙆♂️🙆♂️🙆♂️🙆♂️🙆♂️🙆♂️
पहिल्या वर्षी
भाऊ आले. जिजाऊ, योजना देऊन गेले. चठाले भाऊंशी चांगलेच वाजले. समितीला हो, चांगलेच भाजले. जो बाळा जो जो रे जो ||२||🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
दुसऱ्या वर्षी
रावसाहेब आले. सभासद कर्ज फरक, बँक कर्ज फरक वर्ग करण्याचे ठराव केले. भूखंड खरेदी करणे निश्चित झाले. सभासदांनी सर्व मंजुर केले. जो बाळा जो जो रे जो ||३||🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
तिसऱ्या वर्षी
साहेब आले. सभासद कर्ज फरक, बँक कर्ज फरक गंगाजळीतून वर्ग हो केले. सभासद कर्ज संरक्षण ठेव बळकट केली. जो बाळा जो जो रे जो ||४||🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
चौथ्या वर्षी
आप्पा आले. मार्केट यार्डात जागा घेणे निश्चित झाले. गंगाजळीचे घोडे १५% वर आले. महिलांचा अपमान करून गेले. जो बाळा जो जो रे जो ॥५॥🔥🔥🔥🔥🔥🔥
पाचव्या वर्षी राजसाहेब आला. त्याचा यांनी पुरेपुर वापर केला. भाडेपट्टयाने गाळा हो घेतला. फर्निचरचा घाट हो घातला. सभासदांनी घाव हो घातला. अघोरी निर्णय हाणून पाडला. बिचाऱ्याचा यांनी जीवच घेतला. जो बाळा जो जो रे जो ||६||🔥🔥🔥🔥🔥🔥
सहाव्या वर्षी खेळ सुरु झाला. आप्पाच्या पाठी ……….आला. ऑनलाईनच्या खेळात निघून गेला जो बाळा जो जो रे जो ||७||🏃🏿♂️🏃🏿♂️🏃🏿♂️🏃🏿♂️🏃🏿♂️🏃🏿♂️ सातव्या वर्षी ताईसाहेब आल्या, दुसऱ्याच्या हाती कारभार सोपवून गेल्या. संस्थेची वेबसाईट उघडून गेल्या. जो बाळा जो जो रे जो ||८||🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
आठव्या वर्षी अण्णा आले. संघटनेतून माघारी येऊन पावन झाले. सराना नोटीस देऊन मोकळे झाले. यांच्यामुळे विलासराव कवी हो झाले. जो बाळा जो जो रे जो||९||🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
🤦🏻♂️🤔😇😍😜😀 शब्दांकन विलासराव