महावितरण आक्रोश मोर्चा ः विजय शिवतारे

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर बंद करून ठेवल्यामुळे गावोगावी शेतकऱ्यांची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी महावितरणकडे सातत्याने मागणी करीत असताना अधिकाऱ्यांची अरेरावीच त्यांना ऐकून घ्यावी लागत आहे.

Advertisement

शेतकऱ्यांना पाणी असुन देखील वेळेत विजपुरवठा होत नसल्याने महावितरण कार्यालयावर १ डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढणार आहे असा इशारा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला आहे.
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत शिवतारे यांनी नोटीस बजावली आहे.

Advertisement

राजुरी येथील शेतकऱ्याचा कांदा जाळून गेल्याचं चित्र सोशल मिडीयावर पाहिल्यानंतर शिवतारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वीजबिल वसुलीसाठी ठराविक मुदत शेतकऱ्यांना द्यायला हवी. थेट वीजपुरवठा बंद करणे हा त्यावरील पर्याय असू शकत नाही. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांची पिके वाया गेली असताना महावितरणने असा आडमुठेपणा करणं अपेक्षित नाही.

Advertisement


शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. गावोगावच्या शेतकऱ्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी विजय शिवतारे यांनी केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *