नारायणपूर येथे बॉम्ब सदृश्य वस्तू

Share now

Advertisement

Advertisement

पुरंदर ः श्रीक्षेत्र नारायणपूर ( ता. पुरंदर ) या ठिकाणी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सासवड पोलिस ठाण्याला निनावे फोन आला. कोणाला या ठिकाणी बॉम्ब सदृश्य वस्तू आहे.

Advertisement

हे समजल्यानंतर सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया दुरंदे व गुप्त विभागाचे लियाकतअली मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक नारायणपूर येथे दाखल झाले.

Advertisement


अण्णासाहेब घोलप यांनी सदर परिस्थितीचा अभ्यास करून तातडीने नारायणपूर येथील दत्त मंदिरात असणाऱ्या भाविकांना मंदिरात घेऊन जाण्याची बाहेर जाण्याचे आव्हान केले. तसेच मंदिरात येणारी भाविकांना दर्शनासाठी त्या काळासाठी थांबवण्यात आले.

Advertisement

त्यानंतर बॅरेगेट लावून मंदिर परिसर बंद करण्यात आला. मंदिर पुर्ण पणे भाविकांनी खाली झाले असल्याची खात्री झाल्यानंतर बॉम्ब पथक व शान पथक पुणे यांना कळविण्यात आले.

Advertisement


काही वेळात त्या ठिकाणी बॉम्ब पथक हजर झाले. या पथकाने मंदिरात सर्वत्र पहाणी करून एका बॅगेत बॅटरी सापडली. तपासणीनंतर यात बॅटरी असल्याचे सदर प्रथकाने जाहीर केले. अशा पद्धतीने सासवड पोलीस ठाण्याच्या वतीने मॉकड्रील करण्यात आले. त्यानंतर पुन्हा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *