पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता

Share now

Advertisement

पुरंदर (प्रतिनिधी अक्षय कोलते) तालुक्यात गेली काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील पिके अडचणीत असल्याचे चित्र आहे. कांदा पिकाला खर्च कमी असला तरी वाढत्या औषधांच्या किंमतीमुळे खर्च वाढला आहे.खराब हवामानामुळे औषध फवारणी करणे गरजेचे आहे.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने कांदा पिक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले आहे.

Advertisement


पुरंदर तालुका कमी पर्जन्यवृष्टी असलेला तालुका म्हणून ओळखला जातो.गतवर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस पडला.नोव्हेंबर महिन्यात १७ दिवसात ५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुरंदर तालुक्यात कांदा जास्त प्रमाणात केला जातो.कांदा पिकाला पाणी कमी प्रमाणात लागत असल्याने व कमी वेळात जास्त उत्पादन मिळत असल्याने अल्प जमीन असणारे शेतकरी विशेष करून कांदा पिकाची लागण करतात.पुरंदरचा कांदा विशिष्ट आकार व विशेष गुणधर्म असल्याने जगभरात मागणी आहे .

Advertisement


पुरंदर तालुक्यात विशेष करून कांदा,कोथिंबीर,मेथी, तसेच सीताफळ,डाळिंब,चिकू व अंजीर ही फळपिके घेतली जातात.गेली काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर पिळा पडणे,पाने करपणे,व बुरशीजन्य रोग यांचा प्रादुर्भाव होत आहे.अवकाळी पावसाने अंजीर ,डाळिंब या फळपिकाला तडा जाणे ,फळ फुटणे हा प्रकार होत आहे.अंजीर फळपीकाचे होणारे नुकसान यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे चित्र आहे.
सुरुवातीच्या काळात पावसाची गरज होती.तेव्हा पाऊस झाला नाही.त्यामुळे सुरुवातीला घेतलेले कांदा पीक जळून गेले.व आता कांदा रोप विकत घेऊन कांदा लागण केली.

Advertisement

अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाबरोबरच इतर फळपिके रोगांना बळी पडू लागली आहेत.शेतकरी औषध फवारणी करून रोगराईवर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे.मात्र वातावरण असेच राहिले व अवकाळी पाऊस जास्त झाला तर कांदा पीक सोडून देण्याची परिस्थिती शेतकऱ्यावर ओढावू शकते.असे मत पिसर्वेचे युवा शेतकरी सुखदेव कोलते यांनी व्यक्त केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *