महावितरणने ग्रामपंचायतीला व्यवसाय कर आधी जमा करा

Share now

Advertisement

Advertisement

काळदरीचे सरपंच गणेश काका जगताप यांची मागणी
सासवड (प्रतिनिधी) महावितरण विभागाकडून गेल्या ४० वर्षापासून काळदरी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत व्यवसाय करीत असून कुठलाही परवानगी न घेता महावितरण कंपनीने इलेक्ट्रिकचे पोल, डीपी, हाय टेन्शन चे पोल उभे केलेले असून आजपर्यंत आपल्या महावितरण विभागाने काळदरी ग्रामपंचायतीचा व्यवसायकर भरलेला नसून तो लवकरात लवकर भरावा भरावा असे आशयाचे निवेदन काळदरी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष गणेशकाका जगताप यांनी कार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग सासवड यांना दिले आहे.       निवेदनात पुढे म्हटले आहे की, महावितरण कंपनी कडे आज पर्यंत व्यवसाय कराची रक्कम शिल्लक असून सुद्धा आपली कंपनी ग्रामपंचायत हद्दीत मधील स्ट्रीट लाईटचे पोल वरील लाईट बिल भरण्यासाठी तगादा लावत असून ग्रामपंचायत हद्दीमधील गावठाण व वाड्या-वस्त्या वरील स्ट्रीट लाईटचे कनेक्शन तोडण्यासाठी कर्मचारी पाठवीत आहेत. महावितरण कंपनीस कळवण्यात येते की, ग्रामपंचायतीच्या व्यवसाय करातून वरील लाईट बिल जमा करून राहिलेले रक्कम लवकरात लवकर काळदरी ग्रामपंचायतीला जमा करावी. अशी मागणी काळदरी चे सरपंच गणेशकाका जगताप यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *